पद्मापुरात अस्वलाचा धूडगूस

By admin | Published: July 4, 2016 12:42 AM2016-07-04T00:42:23+5:302016-07-04T00:42:23+5:30

पद्मापूर कोळसा खाणीच्या चेक पोस्ट परिसरातील मोकळ्या जागेत आज रविवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास लोकांना अस्वलाचे दर्शन झाले.

Asadwala Dhadgus in Padmapur | पद्मापुरात अस्वलाचा धूडगूस

पद्मापुरात अस्वलाचा धूडगूस

Next

बघ्यांची गर्दी : नागरिकांकडून अस्वलावर दगडांचा वर्षाव
दुर्गापूर : पद्मापूर कोळसा खाणीच्या चेक पोस्ट परिसरातील मोकळ्या जागेत आज रविवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास लोकांना अस्वलाचे दर्शन झाले. गावात शिरुन ते धूडगूस घालेल, या भीतीपोटी नागरिकांनी तिच्यावर दगडांचा वर्षाव केला.
चंद्रपूर-ताडोबा मार्गावर पद्मापूर कोळसा खाणीचे कार्यालय आहे. येथून पुढे गेल्यावर तपासणी नाका आहे.
या नाक्याच्या परिसरात अगदी ताडोबा रस्त्यालगत मोकळ्या जागेवर आज सकाळी ९ वाजताच्या सुमारास अस्वल बसून असल्याचे ये-जा करणाऱ्या नागरिकांच्या लक्षात आले. तिला बघण्यासाठी लोकांनी तिथे गर्दी केली.
तिला पळविण्यासाठी लोकांनी आरडाओरड केली. तरीही ती जागची हलली नाही. गावात येऊन ती धूडगूस घालेल, म्हणून नागरिकांनी तिच्या दिशेने दगडं भिरकावली. (वार्ताहर)

Web Title: Asadwala Dhadgus in Padmapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.