आशा गटप्रर्वतकांचे धरणे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2018 10:27 PM2018-07-03T22:27:07+5:302018-07-03T22:27:38+5:30

महाराष्ट्र राज्य आशा व गटप्रवर्तक कर्मचारी कृती समिती व महाराष्ट्र आशा व गटप्रवर्तक फेडरेशन आयटक यांच्या वतीने आशा प्रवर्तकांच्या प्रलंबित मागण्यासाठी तालुका आरोग्य कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आला. यावेळी तालुका आरोग्य अधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री यांना विविध मागण्यांचे निवेदन पाठविण्यात आले.

Asha group workers' protest movement | आशा गटप्रर्वतकांचे धरणे आंदोलन

आशा गटप्रर्वतकांचे धरणे आंदोलन

Next
ठळक मुद्देआरोग्य अधिकाऱ्यांना निवेदन : अधिवेशनावर मोर्चा काढणार

लोकमत न्यूज नेटवर्क
ब्रह्मपुरी : महाराष्ट्र राज्य आशा व गटप्रवर्तक कर्मचारी कृती समिती व महाराष्ट्र आशा व गटप्रवर्तक फेडरेशन आयटक यांच्या वतीने आशा प्रवर्तकांच्या प्रलंबित मागण्यासाठी तालुका आरोग्य कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आला. यावेळी तालुका आरोग्य अधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री यांना विविध मागण्यांचे निवेदन पाठविण्यात आले.
राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत महाराष्ट्र राज्यात ग्रामीण पातळीवर ६० हजाराहून अधिक तर शहरी भागातून चार हजार आशा वर्कर काम करीत आहे. मात्र त्यांना अत्यल्प मानधन दिले जाते. आरोग्य स्वयंसेवक या नावाखाली एएनएमच्या दर्जाची बहुतांश कामे गाव पातळीवर व शहरात करावी लागत आहे. आज देशपातळीवर किमान १२ राज्यात १५०० ते ७५०० पर्यंत मानधन मिळत आहे. तसेच केलेल्या कामांच्या मोबदल्यात केंद्राच्या योजनेनुसार मिळणाºया मोबदल्यात इतर राज्य सरकारनेही ३३ टक्के ते १०० टक्के भागीदारी केलेली आहे. परंतु, महाराष्ट्र सरकारने आपल्या हिस्स्याची काहीही भागीदारी केलेली नाही. आज आपल्या राज्यात इतर योजना कर्मचाºयांना काहीना काही मानधन मिळत आहे. तसेच केंद्रीय योजनेंतर्गत महाराष्ट्र शासनाची आर्थिक भागीदारीसुद्धा दिसून येत आहे. परंतु, आरोग्य क्षेत्रातील आशा व गटप्रवर्तकांना महाराष्ट्र राज्याचा हिस्सा अद्यापही मिळला नसल्याने ६५ हजार आशा वर्कर व गटप्रर्वतक आपल्या न्याय मागण्यांसाठी लढत आहेत.
त्यामुळे अशा वर्कर व गटप्रर्वतकांच्या मागण्या पूर्ण कराव्या, त्यांच्या मानधनामध्ये वाढ करावी, यासाठी महाराष्ट्र राज्य आशा गटप्रवर्तक कर्मचारी कृती समितीच्या वतीने अनेकदा निवेदन देण्यात आले. मात्र त्याची दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे सदर आंदोलन करण्यात आले.
तसेच शासनाने मागण्यांची पूर्तता न केल्यास १८ जुलै रोजी नागपूर येथील पावसाळी अधिवेशनात आशा गटप्रवर्तक कर्मचारी कृती समितीच्या वतीने मोर्चा काढण्याचा इशारा संघटनेचे राज्य उपाध्यक्ष विनोद झोडगे यांनी दिला. यावेळी तालुक्याध्यक्ष नामदेव नखाते, छाया बोदेले उपस्थित होते.

Web Title: Asha group workers' protest movement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.