विसापुरात आशा वर्कर व माजी सरपंचांचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2021 04:33 AM2021-08-18T04:33:19+5:302021-08-18T04:33:19+5:30
अध्यक्षस्थानी सरपंच वर्षा कुळमेथे होत्या. प्रमुख अतिथी म्हणून उपसरपंच अनेकश्वर मेश्राम, ग्रामपंचायत सदस्य शारदा डाहुले, रिना कांबळे, सूरज टोमटे, ...
अध्यक्षस्थानी सरपंच वर्षा कुळमेथे होत्या. प्रमुख अतिथी म्हणून उपसरपंच अनेकश्वर मेश्राम, ग्रामपंचायत सदस्य शारदा डाहुले, रिना कांबळे, सूरज टोमटे, हर्षला टोंगे, वैशाली पुणेकर, गजानन पाटणकर, सुनील रोंगे, प्रदीप गेडाम, दिलदार जयकर, सुरेखा इटणकर, विद्या देवाळकर, शशिकला जिवणे, संदीप काकडे, ग्रामविकास अधिकारी राकेश मांढरे यांची उपस्थिती होती. कोरोना योद्धा म्हणून कल्पना मिलमिले, तरामती जीवणे, सुशीला करमणकर, छाया गावंडे, माया करमणकर, उषा पुणेकर, उषा अनिल मेश्राम, नीता रूपेश कौरासे, छाया मनिष दुबे, मीनाक्षी इंदुरकर यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
गावाच्या विकासात योगदान दिल्याबद्दल माजी सरपंच बंडू गिरडकर, भारत जीवणे, संध्या पेंदोर, रिता जिलटे, सुभद्रा दुर्वे, रामभाऊ टोंगे यांना सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ प्रदान करून सत्कार करण्यात आला. स्वच्छता कर्मचारी बबन कोसरे, शोभा येडमे, सुनंदा नान्हे, कल्पना कोडापे, नलिनी शेंडे यांनाही अतिथीच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. संचालन राजू पुणेकर यांनी केले. आभार प्रदर्शन ग्रामविकास अधिकारी आर.के. मांढरे यांनी केले. यावेळी प्राथमिक आरोग्य वैद्यकीय अधिकारी डाॅ.आयेशा मडावी, आरोग्य कर्मचारी, शिक्षकवृंद, पोलीस कर्मचारी, गावातील गणमान्य नागरिकांची उपस्थिती होती.
170821\img20210815101559.jpg
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी विसापूरकरांचा आशा वर्करच्या कर्तृत्वाला सलाम