आशा वर्कर महिलांचा मेळावा
By admin | Published: August 26, 2014 11:22 PM2014-08-26T23:22:08+5:302014-08-26T23:22:08+5:30
आशा वर्करची बैठक आनंद भवनात शनिवारी नंदा मुळे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. प्रास्ताविक भाषणात इंदू पिंगे म्हणाल्या, राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत
चंद्रपूर : आशा वर्करची बैठक आनंद भवनात शनिवारी नंदा मुळे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली.
प्रास्ताविक भाषणात इंदू पिंगे म्हणाल्या, राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत आशा वर्कर विना वेतन तसेच विना मानधनाने काम करीत आहेत. आज ना उद्या केलेल्या सेवेचा लाभ मिळेल, या आशेवर कुठल्याही प्रकारची तक्रार न करता आशा वर्कर काम करीत आहेत. आता आरोग्य सहायक म्हणून अंगणवाडी सेविकेची नव्याने नियुक्ती केल्या जात आहे. कंत्राटी पद्धती असली तरी तिलाही तीन हजार रुपये मानधन दिल्या जाणार आहे. निवडीसाठी अर्ज मागविण्यात आले असून वयोमर्यादा ३० वर्षे ठेवण्यात आली आहे.
केंद्र शासनाच्या योजनेमध्ये आम्ही काम करीत असल्याने आशा वर्करसाठी वयोमर्यादा शिथील करण्यात यावी, अशी त्यांनी मागणी केली. जयमाला बारसागडे म्हणाल्या, वयाच्या नावाखाली आशा वर्करला डावलने हा त्यांच्यावर फार मोठा अन्याय आहे. एकात्मिक बाल विकास सेवा योजना ही केंद्रशासित योजना आहे आणि आम्ही देखील राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाअंतर्गत सहा वर्षांपासून काम करीत आहोत. आमची सेवा व कामाचा अनुभव लक्षात घेऊन अंगणवाडी सेविकेची नव्याने निवड करताना आशा वर्करसाठी वयोमर्यादा शिथील करण्यात यावी. प्रा. रमेशचंद्र दहीेवडे यांनी देखील मेळाव्याला मार्गदर्शन केले. विना वालदे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
मेळावा यशस्वी करण्याकरीता चित्रलेखा मोटघरे, सुनंदा चुनारकर, प्रज्ञा साव यांच्यासह संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले. (प्रतिनिधी)