आसोलामेंढाची वडेट्टीवारांना भुरळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2019 12:48 AM2019-08-14T00:48:54+5:302019-08-14T00:49:55+5:30
आसोलामेंढा तलावाचे सौंदर्य न्याहाळण्याचा मोह सावली ब्रह्मपुरी क्षेत्राचे आमदार तथा राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनाही आवरता आले नाही. हे त्यांनी दिलेल्या भेटीने स्पष्ट झाले आहे. तलावाचे नैसर्गिक सौंदर्य आणि सांडव्यावरुन वाहणाऱ्या पाण्याचा आनंद घेण्यासाठी अनेक पर्यटक कुटुंबासह या ठिकाणी येत आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
सावली: आसोलामेंढा तलावाचे सौंदर्य न्याहाळण्याचा मोह सावली ब्रह्मपुरी क्षेत्राचे आमदार तथा राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनाही आवरता आले नाही. हे त्यांनी दिलेल्या भेटीने स्पष्ट झाले आहे. तलावाचे नैसर्गिक सौंदर्य आणि सांडव्यावरुन वाहणाऱ्या पाण्याचा आनंद घेण्यासाठी अनेक पर्यटक कुटुंबासह या ठिकाणी येत आहेत.
आसोला मेंढ्याच्या सौंदर्याची महती पंचक्रोशीत आहे. आमदार वडेट्टीवार यांनाही या स्थळाला भेट देऊन सौंदर्य न्याहाळण्याचा मोह आवरता आला नाही. पर्यटकांचे जत्थे या ठिकाणी येत आहेत. पर्यटकांना आसोलामेंढाची जणू भूरळ पडली असल्याचे चित्र सध्या येथील गर्दीवरून दिसत आहे. धकाधकीच्या जीवनातून मुक्त होण्यासाठी अनेक पर्यटकांची पाऊले आसोला मेंढाच्या दिशेने येत आहे. आमदार वडेट्टीवार यांनी भेट दिल्यानंतर येथील निसर्गरम्य परिसर आनंददायी असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
या क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचेही आ. वडेट्टीवार यांनी यावेळी सांगितले.
मुख्यमंत्र्यांकडे १० कोटींची मागणी करणार
आसोला मेंढा तलाव हे स्थळ पर्यटन क्षेत्राच्या दृष्टीने विकसित करण्याकरिता आपण मुख्यमंत्र्यांना १० कोटी रुपयांची मागणी करणार आहोत. येथील नैसर्गिक सौंदर्यात भर घालण्यासाठी या परिसरात पर्यटकांना थांबण्यासाठी हॉटेल्स, रेस्टारंट, बोटींग याशिवाय जंगल भ्रमंती या सारख्या सुविधा येथे उपलब्ध करण्याचा आपला प्रयत्न असल्याचेही त्यांनी सांगितले.