सुरक्षा रक्षकावर प्राणघातक हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2021 04:23 AM2021-01-15T04:23:56+5:302021-01-15T04:23:56+5:30

सचिन गवरी असे प्राणघातक हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या सुरक्षा रक्षकाचे नाव आहे. बुधवारी रात्रपाळीत भटाळी कोळसा खाणीतील सब स्टेशन ...

Assault on a security guard | सुरक्षा रक्षकावर प्राणघातक हल्ला

सुरक्षा रक्षकावर प्राणघातक हल्ला

Next

सचिन गवरी असे प्राणघातक हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या सुरक्षा रक्षकाचे नाव आहे. बुधवारी रात्रपाळीत भटाळी कोळसा खाणीतील सब स्टेशन परिसरात हा कर्तव्यावर होता. रात्री ११.३० वाजताच्या सुमारास तीन चोरटे या परिसरात चोरी करण्याकरिता शिरले. तेथील लोखंडी साहित्य चोरून नेण्याच्या प्रयत्नात असताना सुरक्षा रक्षकाने त्यांना हटकले. त्यामुळे तिन्ही चोरट्यांनी सुरक्षा रक्षकावर प्राणघातक हल्ला केला. लगतच्या भिंतीला डोके आपटून गंभीर जखमी केले. जवळच असलेल्या इतर सुरक्षारक्षकांनी घटनास्थळी धाव घेत शुभम शेंडे व प्रमोद चन्नुरवार रा. अष्टभुजा वार्ड, चंद्रपूर या दोघांना पकडून दुर्गापूर पोलिसांच्या स्वाधीन केले. तिसरा आरोपी पळून गेला. दुर्गापूर पोलिसांनी या दोघांवर कलम ३५३, ३३२, ३४ अन्वये गुन्हा दाखल करून अटक केली आहे. तिसऱ्या आरोपीचा पोलीस शोध घेत आहेत.

Web Title: Assault on a security guard

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.