जमिनीचे मूल्यांकन करून मोबदला द्यावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2018 12:17 AM2018-11-19T00:17:23+5:302018-11-19T00:18:24+5:30
गोंडपिपरी, मूल, पोंभुर्णा, सावली तालुक्यातून जाणाऱ्या रायगड-पोग्लूर ८०० केव्ही टॉवर वाहिनी उभारणीचे काम सुरू आहे. शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारचा मोबदला न देता त्यांच्या जमिनीचे मूल्यांकन न करता तुटपूंजी आर्थिक मोबदला देण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंडपिपरी : गोंडपिपरी, मूल, पोंभुर्णा, सावली तालुक्यातून जाणाऱ्या रायगड-पोग्लूर ८०० केव्ही टॉवर वाहिनी उभारणीचे काम सुरू आहे. शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारचा मोबदला न देता त्यांच्या जमिनीचे मूल्यांकन न करता तुटपूंजी आर्थिक मोबदला देण्यात आला. प्रसंगी पोलिसांचा धाक दाखवून बळजबरीने टॉवर उभारणीचे काम करीत होते. दरम्यान, शेतकऱ्यांनी आमदार बाळू धानोरकर यांची भेट घेऊन योग्य मोबदला देण्याची मागणी निवेदनातून केली.
शेतकऱ्यांची अडचण लक्षात घेता बुधवारी गोंडपिपरी येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित बैठकीत टॉवरग्रस्त शेतकऱ्यांसाठी शासनाने दिलेले निर्देश व शेतकऱ्यांना कशाप्रकारे मोबदला मिळाला पाहिजे याबाबत मार्गदर्शन केले. जोपर्यंत योग्य मोबदला मिळत नाही तोपर्यंत काम न करू देण्याचे आश्वासन आमदार धानोरकर यांनी शेतकºयांना दिले. याप्रसंगी सहसंपर्क प्रमुख रमेश तिवारी, शिवसेना उपजिल्हा प्रमुख सुनील संकुलवार, सिक्की यादव, जयदीप रोडे, नितीन पिपरे, दत्तू मोर, टॉवरग्रस्त शेतकरी उपस्थित होते.