तंटामुक्त पुरस्कारासाठी मूल्यांकन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2018 12:52 AM2018-03-30T00:52:57+5:302018-03-30T00:52:57+5:30

महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीच्या माध्यमातून गावात शांतता व सुव्यवस्था सुरळीत राहावी, याकरिता राबविलेल्या उपाय योजनांचे मूल्यांकन करण्यासाठी जिल्हाबाह्य समितीने तळोधी, चिंधीचक ....

Assessment for a quote-free award | तंटामुक्त पुरस्कारासाठी मूल्यांकन

तंटामुक्त पुरस्कारासाठी मूल्यांकन

Next
ठळक मुद्देउपक्रमांची घेतली माहिती : ग्रामस्थांच्या अपेक्षा वाढल्या

ऑनलाईन लोकमत
तळोधी (बा.): महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीच्या माध्यमातून गावात शांतता व सुव्यवस्था सुरळीत राहावी, याकरिता राबविलेल्या उपाय योजनांचे मूल्यांकन करण्यासाठी जिल्हाबाह्य समितीने तळोधी, चिंधीचक आणि नवेगाव हुडेश्वरी या गावांना नुकतीच भेट दिली.
नागभीड तालुक्यातील नागभीड पोलीस स्टेशनअंतर्गत चिंधीचक व नवेगाव हुडेश्वरी व तळोधी (बा.) पोलीस स्टेशनअंतर्गत तळोधी (बा.) येथील तंटामूक्त गाव समितीने विविध उपक्रम राबविले. अवैध धंद्यांवर प्रतिबंध घालून सामाजिक सुरक्षिततेसाठी कार्यक्रम राबविले. जातीय व धार्मिक सलोखा निर्माण करण्यासाठी प्रोत्साहन दिले. भांडणे गावातच मिटवून शांतता निर्माण केली. सार्वजनिक उत्सवातही जागृती करून महिलांच्या अधिकारांचे महत्त्व पटवून दिले. तंटामूक्त गाव समितीकडून विविध कार्यक्रमांचे आयोजन सुरूच असते. त्यामुळे ही गावे तालुक्यात चर्चेचा विषय ठरली आहेत. जिल्हा बाह्य समितीच्या सदस्यांनी सर्व उपक्रमांची माहिती घेवून अहवाल तयार करणार आहे. समितीमध्ये नायब तहसीलदार पी.एम. डांगे, ठाणेदार महेश पाटील, भूमापन अधिकारी डी. पी. जाधव, दौलत धोटे, प्रशांत झिमटे, आशा बगमारे, संवर्ग विकास अधिकारी एम. ई. कोमलवार आदी उपस्थित होते.
यावेळी नागभीड पोलीस व तळोधी (बा.) पोलीस ठाण्यातील सर्वांनी मूल्यांकन करण्यासाठी जिल्हा बाह्य समितीला सहकार्य केले. हा अहवाल गृह विभागाकडे सादर केल्यानंतरच अंतिम निर्णय होणार आहे. मात्र, समितीने उपक्रमांची प्रशंसा केल्याने ग्रामस्थांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत.
दरम्यान, वर्षभर विविध उपक्रम राबविण्याचा संकल्प युवक व विविध संघटना आणि ग्रामपंचायतीने केला आहे. तळोधी (बा.) येथील तंटामुक्त समितीचे माजी अध्यक्ष प्रा. उपेंद्र चिटमलवार, विद्यमान अध्यक्ष समिता मदनकर, सरपंच राजू रामटेके, ग्रामविकास अधिकारी अडाऊ, तलाठी झाडे, माजी पोलीस पाटील रमेश बावनकर आदी उपस्थित होते.

Web Title: Assessment for a quote-free award

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.