मालमत्ता कर भरल्यास मिळणार शास्ती सवलत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2019 10:35 PM2019-02-05T22:35:15+5:302019-02-05T22:35:43+5:30

महानगरपालिकेने सन २०१५-१६ रोजी प्रथमच ‘घर ते घर’ सर्व्हेक्षण करून डिजिटल छायाचित्र काढून कर आकारणी केली. त्यामुळे पूर्वी केलेल्या आकारणीत सन २०१५-१६ पासून अचूक कर आकारणी झाली. पूर्वीच्या तुलनेत मालमत्ता करात वाढ झाली. शिवाय, शास्ती (व्याज) आकारण्यात आली. मात्र कर भरल्यास यामध्ये १०० टक्के सवलत देण्याचा निर्णय मनपाने घेतला आहे.

Asset tax relief will be available on property tax | मालमत्ता कर भरल्यास मिळणार शास्ती सवलत

मालमत्ता कर भरल्यास मिळणार शास्ती सवलत

Next
ठळक मुद्देमहानगर पालिकेची योजना : सर्वसाधारण सभेत ठराव पारित

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : महानगरपालिकेने सन २०१५-१६ रोजी प्रथमच ‘घर ते घर’ सर्व्हेक्षण करून डिजिटल छायाचित्र काढून कर आकारणी केली. त्यामुळे पूर्वी केलेल्या आकारणीत सन २०१५-१६ पासून अचूक कर आकारणी झाली. पूर्वीच्या तुलनेत मालमत्ता करात वाढ झाली. शिवाय, शास्ती (व्याज) आकारण्यात आली. मात्र कर भरल्यास यामध्ये १०० टक्के सवलत देण्याचा निर्णय मनपाने घेतला आहे.
मालमत्ता वाढ झाल्याने नागरिकांमध्ये नाराजी निर्माण झाली होती. शहरातील बऱ्याच नागरिकांची मालमत्ता कर भरण्याइतपत आर्थिक परिस्थिती नाही. काही प्रभागांमध्ये मालमत्तेसंदर्भात आपसी वाद आहेत. यामध्ये शास्तीच्या रक्कमेत वाढ झाली आहे. या बाबींचा विचार करता करवसुली नियमित व प्रभावीपणे व्हावी, मालमत्ताधारकानां कर भरणे सुलभ व्हावे, यादृष्टीने शास्तीत सवलत देण्याचा विषय आयुक्त संजय काकडे यांनी ३१ जानेवारी २०१९ रोजी पार पडलेल्या सर्वसाधारण सभेपुढे ठेवला होता.
चर्चेअंती शास्तीमध्ये सुट देण्यास निर्णय घेण्यात आला आहे. १ ते १५ फेब्रुवारी २०१९ पर्यंत थकबाकीसह पूर्ण रक्कम भरणाºयाला शास्ती शंभर टक्के माफ करण्याचा निर्णय मनपाने घेतला आहे. १६ ते २८ फेब्रुवारीपर्यंत शास्तीत ७५ टक्के व १ ते १५ मार्चपर्यंत ५० टक्के सुट देण्याचा निर्णय झाला. मालमत्ताधारकांनी संधीचा फायदा घेऊन कराचा तत्काळ भरणा करावा व जप्तीची कारवाई टाळावी, अशी माहिती मनपाच्या वतीने देण्यात आली आहे.
१७ कोटी २३ लाखांची कर वसुली
थकीत कर वसुलीसाठी आयुक्त संजय काकडे यांच्या मार्गदर्शनात मोहीम सुरू आहे. कर भरणा न करणाºया मालमत्ताधारकांवर मार्चअखेरपर्यंत जप्तीची कारवाई सुरुच राहणार आहे. सामाजिक दायित्व म्हणून शहरातील हजारो मालमत्ताधारकांनी मनपाच्या मोहिमेला सहकार्य केले. त्यामुळे सोमवारपर्यंत १७ कोटी २३ लाखांची कर वसुली झाली. ३९ कोटी ६८ लाखांची मागणी होती. त्यापैकी ४६ टक्के कर वसूल करण्यास मनपा कर विभागाला यश आले आहे, अशी माहिती कर विभाग प्रमुख तुकड्यादास डुमरे यांनी दिली.

Web Title: Asset tax relief will be available on property tax

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.