शेतकरी कल्याण निधीतून जिल्हा बँकेकडून मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2017 11:39 PM2017-09-08T23:39:28+5:302017-09-08T23:39:40+5:30
चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला शेतकºयांची बँक म्हणून ओळखले जाते. ही ओळख कायम ठेवण्यासाठी शेतकºयांना कठीण प्रसंगी सहकार्य करण्याची भूमिका बँकेची असते.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला शेतकºयांची बँक म्हणून ओळखले जाते. ही ओळख कायम ठेवण्यासाठी शेतकºयांना कठीण प्रसंगी सहकार्य करण्याची भूमिका बँकेची असते. ही बँक सामाजिक बांधिलकी जोपासत ‘शेतकरी कल्याण निधी’ निर्माण करून सहकारात्मक योजना राबवित आहे.
जिल्ह्यात ग्रामीण भागातील शेतकरी, शेतमजूर, दुर्बल घटक, गरीब, गरजूंना कल्याण निधीतून आर्थिक मदत दिली जाते. याच निधी अंतर्गत चंद्रपूर जिल्ह्यातील बाबुपेठ येथील रहिवाशी रामभाऊ किसन मांढरे यांच्या बोन मॅरो आजारग्रस्त मुलाला उपचाराकरिता आर्थिक मदत दिली आहे. त्यांची आर्थिक परिस्थिती हालाकीची असल्याने उपचार घेणे त्यांना शक्य नव्हते. ही बाब जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनोहर पाऊणकर यांना माहित होताच तातडीने जिल्हा बँकेच्या वतीने त्यांच्या कक्षात रामभाऊ मांढरे यांना ६० हजार रुपयाचा धनादेश आर्थिक मदत म्हणून दिला.
याप्रसंगी बँकेचे संचालक पांडूरंग जाधव, बँकेचे व्यवस्थापक आर.एम. बोबडे, माजी नगरसेवक बंडू हजारे, पुंडलिकराव बलकी, रामभाऊ मांढरे, सुषमा मांढरे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
कठीण प्रसंगी कोेणतीही मदत करण्यास बॅक तयार असल्याने पाऊणकर यांनी सांगितले.