कृषी उत्पन्न बाजार समितीतर्फे शेतकऱ्याला मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2021 04:35 AM2021-09-09T04:35:00+5:302021-09-09T04:35:00+5:30
चंद्रपूर : तालुक्यातील पिंपळगाव येथील शेतकरी पुंडलिक वासुदेव उपरे यांच्या बैलाचा ऐन हंगामात मृत्यू झाला. कृषी उत्पन्न बाजार समिती ...
चंद्रपूर : तालुक्यातील पिंपळगाव येथील शेतकरी पुंडलिक वासुदेव उपरे यांच्या बैलाचा ऐन हंगामात मृत्यू झाला. कृषी उत्पन्न बाजार समिती चंद्रपूरतर्फे राबवित येत असलेल्या योजनेंतर्गत त्यांना सात हजार ५०० रुपयांचा धनादेश सभापती दिनेश दादापाटील चोखारे यांच्या हस्ते देऊन मदत करण्यात आली. कृषी उत्पन्न बाजार समितीतर्फे शेतकऱ्यांसाठी विविध उपाययोजना राबविण्यात येतात. शेतीचा हंगाम सुरू असतानाच पुंडलिक उपरे यांच्या बैलाचा मृत्यू झाला. याबाबतची माहिती कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिनेश चोखारे यांना मिळताच त्या शेतकऱ्याला समितीच्या योजनेतून मदत करण्यात आली. त्यांना सात हजार ५०० रुपयांचा धनादेश वितरित करण्यात आला. या वेळी उपसभापती रणजीत डवरे, गोविंदा पोडे, चंद्रकांत गुरू, योगेश्वर बोबडे, नागेश बोंडे, अरविंद चवरे, प्रभाकर सिडाम, शोभा वरारकर, शीला मेकलवार, भोभा ठाकरे, जि. प. सदस्य वैशाली दुधलकर, सुधाकर वरारकर उपस्थित होते.