शेतकरी कल्याण निधी अंतर्गत मृतकाच्या पत्नीला मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2021 04:28 AM2021-05-09T04:28:27+5:302021-05-09T04:28:27+5:30
भद्रावती : चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शेतकरी कल्याण निधी योजनेंतर्गत संचालक रवींद्र शिंदे यांच्या पुढाकाराने चिचोली येथील जंगली ...
भद्रावती : चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शेतकरी कल्याण निधी योजनेंतर्गत संचालक रवींद्र शिंदे यांच्या पुढाकाराने चिचोली येथील जंगली जनावराने ठार मारलेल्या शेतमजुराच्या पत्नीला १० हजार रुपये रोख रकमेचा धनादेश देऊन मदतीचा हात देण्यात आला.
चिचोली येथील शेतमजूर मोरेश्वर श्रीरामे यांच्यावर वन्यप्राण्याने हल्ला केला, यात त्यांचा मृत्यू झाला होता. रवींद्र शिंदे यांच्या माध्यमातून बुधवारी बँकेच्या दालनात शेतकरी कल्याण निधी अंतर्गत मृतकाची पत्नी शालू श्रीरामे हिला १० हजार रोख रकमेचा धनादेश देऊन मदत देण्यात आली.
यावेळी चोरा आदिवासी संस्थेचे अध्यक्ष बी. टी. जांभुळे, उपाध्यक्ष गुंडू चौधरी, संस्थेचे व्यवस्थापक विकास दोहतरे, बँकेचे व्यवस्थापक विजय खंगार, निरीक्षक पवन ठाकरे, कोषपाल एस. डी. ठेंगणे, आदी उपस्थित होते.