चंद्रपूर जिल्हा परिषदेत सहाय्यक प्रशासन अधिकारी कोरोनाबाधित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2020 01:46 PM2020-07-31T13:46:23+5:302020-07-31T13:46:43+5:30
चंद्रपूर जिल्हा परिषदेत ब्रह्मपुरी येथून आलेला सहाय्यक प्रशासन अधिकारी कोरोना बाधित निघाल्याने जिल्हा परिषद इमारत सील केली.
Next
ठळक मुद्देइमारत बंद
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : चंद्रपूर जिल्हा परिषदेत ब्रह्मपुरी येथून आलेला सहाय्यक प्रशासन अधिकारी कोरोना बाधित निघाल्याने जिल्हा परिषद इमारत सील केली. जिल्हा परिषदेत अधिकारी व कर्मचारी हजर झाल्यानंतर ही बाब निदर्शनास आली. इमारतीच्या आत सर्व अधिकारी व कर्मचारी आहे. कुणालाही आत जाऊ देणे बंद करण्यात आले आहे. इमारत सॅनेटाईझ करणे सुरू आहे.