अन्न औषध प्रशासनाचा सहायक आयुक्त एसीबीच्या जाळ्यात
By admin | Published: January 20, 2015 11:10 PM2015-01-20T23:10:06+5:302015-01-20T23:10:06+5:30
किराणा दुकानाचा परवाना नुतनीकरणासाठी एक हजार रुपयाची लाच घेताना अन्न औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त गुलाब गोरे याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात अटक केली.
चंद्रपूर : किराणा दुकानाचा परवाना नुतनीकरणासाठी एक हजार रुपयाची लाच घेताना अन्न औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त गुलाब गोरे याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात अटक केली. ही कारवाई मंगळवारी सकाळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली.
मूल येथील एका किराणा व्यावसायिकाला परवाना नुतनीकरणासाठी अन्न औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त गोरे याने प्रथम दहा हजार रुपयांची मागणी केली. मात्र तक्रारदाराने रक्कम देण्यास नकार दिल्यानंतर तडजोडीतून तीन हजार देण्याचे ठरले. प्रथम दोन हजार रुपये गोरे याने स्वीकराल्यानंतर एक हजार रुपये दिल्याशिवाय परवाना मिळणार नाही असे बजावले. त्यामुळे त्रस्त झालेल्या तक्रारदाराने लाचलुतपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. तक्रारीनुसार मंगळवारी सापळा रचण्यात आला. यात एक हजार रुपयाची लाच स्वीकारताना गोरेला अटक करण्यात आली. सदर कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपायुक्त प्रकाश जाधव, अप्पर पोलीस अधिक्षक यशवंत मतकर, पोलीस निरीक्षक विठ्ठल आचेवार, अजय भुसारी, सुरेंद्र खनके, मनोहर एकोणकर, महेश मांढरे, मनोज पिदूरकर, संदीप वासेकर, अरुण हटवा, भास्कर चिंचवलकर आदींनी केली.(नगर प्रतिनिधी)