लाल्या रोगाच्या आक्रमणाने कापसाचे पीक करपू लागले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2017 11:36 PM2017-09-08T23:36:50+5:302017-09-08T23:37:09+5:30
हातात आलेली पिके उन्हाच्या तडाख्याने आणि लाल्या रोगाच्या प्रादुर्भावाने कुठे लाल पडली तर कुठे करपली जात आहे.
शंकर चव्हाण ।
लोकमत न्यूज नेटवर्क
जिवती : हातात आलेली पिके उन्हाच्या तडाख्याने आणि लाल्या रोगाच्या प्रादुर्भावाने कुठे लाल पडली तर कुठे करपली जात आहे. त्यामुळे शेतकºयांची चिंता वाढली आहे.
पेरणीपूर्व व पेरणीनंतर शेतकºयांच्या बांधावर जाऊन कृषीवर आधारित शासन योजनांची पुरेपूर माहिती शेतकºयांना द्यायची असते. जेणेकरून शेतकºयांना तांत्रिक पद्धतीचा वापर करत कमी खर्चात अधिक उत्पन्न घेता येईल, ही त्यामागील शासनाची भूमिका आहे. मात्र पिकांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव वाढल्यानंतरही कृषी अधिकारी व कर्मचारी पहाडावरील शेतकºयांच्या बांधावर पोहचले नाहीत.
पहाडावर शेतकºयांना वर्षानुवर्षे निर्सगाच्या कचाट्यात सापडावे लागत आहे. कधी कोरडा दुष्काळ तर कधी ओला दुष्काळ, हे शेतकºयांना पाचविलाच पुंजले आहे. यावर्षीच्या खरिप हंगामातही पावसाने पाठ फिरवली.
जुलै महिन्याच्या समाधानकारक पावसाने शेतकरी सुखावले होते. सर्वत्र हिरवा शिवार दिसायले लागले होते. परंतु, मध्यतंरीच्या काळात पुन्हा पावसाने तब्बल महिनाभर दडी मारल्याने कोवळी पिके कोमेजून गेली होती. महिनाभरानंतर पाऊस झाल्याने कोमेजून गेलेली पिके वाचली. आता तरी पाऊस साथ देईल व भरघोस उत्पन्न घेता येईल, असे वाटत असतानाच निर्सगराजा पुन्हा रूसला आणि हाती आलेली उभे पीक रोगामुळे करपू लागले आहे. त्यामुळे अल्पावधीतच शेतकºयांच्या स्वप्नांचा चुराडा झाला आहे.
कुठे पावसाने पिके करपली तर कुठे लाल्या रोगाच्या प्रादुर्भावाने कापूस पिके लाल पडली आहेत. कापूस पिकावर हिरवा रंग यावा यासाठी विविध कंपन्याची किटकनाशके फवारली जात आहेत. परंतु, पिकात कुठलाही बदल झालेला दिसत नसल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. असे असतानाही कृषी अधिकारी व कर्मचारी शेतकºयांच्या बांधावर एकदाही भेट देत नसल्याने शेतकºयांना मार्गदर्शन मिळत नाही. अशा अधिकाºयांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
कृषी अधिकाºयांची अनियमित उपस्थिती
जिवती येथील कृषी अधिकारी नियमित येत नाही. शेतकरी मेळावे किंवा शेतकºयांना लाभदायक मार्गदर्शन करीत नाही. त्यामुळे कृषी विभाग कार्यालयाचा शेतकºयांना कसलाच फायदा झालेला दिसत नाही. शेतकºयांच्या प्रश्नांकडे कृषी अधिकारीच दुर्लक्ष करीत असेल, तर शेतकºयांच्या समस्या सुटायच्या कशा, हा प्रश्नच आहे.
पावसाची शेतकºयांना प्रतीक्षाच
मागील आठवडाभरापासून पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे परिसरातील शेतातील पिके करपू लागल्याने बी-बियासाठी काडलेले कर्ज फेडायचे कसे, संसाराचा गाडा चालवायचा कसा, असे अनेक प्रश्न शेतकरी डोळ्यात अश्रू घेऊन बोलताना दिसत आहे. निर्सगाने शेतकºयांच्या चेहºयावरचे हास्यच हिरावून घेतल्याचे प्रत्यक्ष पीक पाहणीत आढळून आले.