ताडोबात काळ्या बिबट्याचे पुन्हा झाले दर्शन...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 7, 2018 11:41 AM2018-06-07T11:41:52+5:302018-06-07T11:41:59+5:30
ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील कोळसा वनपरिक्षेत्रात काही दिवसांपूर्वी काळा बिबट आढळल्याने पर्यटकांमध्ये आनंदाची लहर पसरली होती.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर: ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील कोळसा वनपरिक्षेत्रात काही दिवसांपूर्वी काळा बिबट आढळल्याने पर्यटकांमध्ये आनंदाची लहर पसरली होती. यावरून सोशल मिडियावरही बराच खल झाला. ताडोबातील कॅमेऱ्यातही हा बिबट कैद झाल्याने त्यावर शिक्कामोर्तब झाले. हा बिबट बुधवारी पुन्हा याच परिसरात श्वेताकुमार रंगाराव बोब्बीली यांना दिसला. त्यांनी त्याला कॅमेऱ्यात कैद केले.
काळा बिबट हा दुर्मिळ असा प्राणी असून त्याच्या मायावी रुपामुळे त्याला जंगलातील भूत असेही संबोधले जात असते. त्याला बालगोपालांच्या भाषेत बघिरा असेही नामाभिधान दिले जाते.
चंद्रपुरातल्या ताडोबा अंधारी प्रकल्पात २२ मे रोजी मंगळवारी कोळसा वन परिक्षेत्रात शिवणझरी पाणवठ्यापाशी हा काळा बिबट प्रथम आढळला होता. बेल्जियमचे पर्यटक जीन फ्रँकॉईस आणि ज्युलिएट यांनी हा काळा बिबट सगळ्यात आधी पाहिला आणि त्याला कॅमेराबद्ध केलं होतं.