जादूटोणाच्या संशयावरून काकाला गुंडांमार्फत तलवारीने जिवे मारण्याचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2021 04:22 AM2021-06-02T04:22:09+5:302021-06-02T04:22:09+5:30
जुनगाव येथील विलास रघुनाथ भाकरे यांचा पुतण्या श्रीकृष्ण चरणदास भाकरे याचे तीन वर्षांपूर्वी लग्न होऊनही अपत्य झाले नाही. 下下下下下下下下下下चुलत्यानेच载载载载载载载载载载 ...
जुनगाव येथील विलास रघुनाथ भाकरे यांचा पुतण्या श्रीकृष्ण चरणदास भाकरे याचे तीन वर्षांपूर्वी लग्न होऊनही अपत्य झाले नाही. 下下下下下下下下下下चुलत्यानेच载载载载载载载载载载 जादूटोणा केल्याच्या संशयावरून काकाला जिवे मारण्याचा 下下下下下下下下下下कट载载载载载载载载载载 रचला. अशातच श्रीकृष्ण 下下下下下下下下下下हा载载载载载载载载载载 सासुरवाडी 下下下下下下下下下下कवठी载载载载载载载载载载 (सावली) येथील गुंडप्रवृत्तीच्या व्यक्तींना सोबत घेऊन 下下下下下下下下下下जुनगावात载载载载载载载载载载 सोमवारी विलास भाकरे याच्या घरी गेला. तलवार व बंदुकीचा धाक दाखवत लाथाबुक्क्यांनी मारहाण करीत असताना दुसऱ्याच्या घरात त्याने आश्रय घेतल्याने 下तो载 बचावला. 下या载 घटनेने गावात एकच खळबळ उडाली.
सदर घटनेची माहिती मिळताच लागलीच बेंबाळ पोलीस घटनास्थळी दाखल झाले. श्रीकृष्णच्या टोळक्याला पोलीस दिसताच पळून जाण्याचा प्रयत्न सुरू झाला. अशातच गावकऱ्यांच्या सहकार्याने श्रीकृष्ण चरणदास भाकरे (५०), नीलेश रमेश पाल (२३), भूषण विनोद पाल (१७), महेश दयाराम फाले (२२, सर्व रा. कवठी (सावली)) तसेच निखिल सुरेश ताजने (२३, रा. नंदोरी (भद्रावती), मिथुन सोमेश्वर चुदरी (२०, रा. मोखाळा (सावली) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
आरोपीकडील तलवार, फायटर पंच, काठी, प्लास्टिक फिस्टर बंदूक व दुचाकी हस्तगत केले. आरोपींविरुद्ध कलम १४३, १४४, १४८, १४९, ३२४, ४५२ भादंवि सहकलम ४/२५ भारतीय हत्यार कायदा अन्वये गुन्हा दाखल करुन अटक केली.
पुढील तपास मु. पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सतिशसिंह राजपूत यांचे मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत ठवरे करीत आहेत.