नागभीड-कोटगाव रेल्वे फाटक बंद करण्याचा प्रयत्न

By admin | Published: July 29, 2016 12:51 AM2016-07-29T00:51:18+5:302016-07-29T00:51:18+5:30

नागभीड आणि कोटगाव रेल्वे फाटकावरुन सुरू असलेली लोकांची अवागमन रेल्वे बंद करणार आहे.

An attempt to stop the Nagabhid-Kotgaan Railway Gate | नागभीड-कोटगाव रेल्वे फाटक बंद करण्याचा प्रयत्न

नागभीड-कोटगाव रेल्वे फाटक बंद करण्याचा प्रयत्न

Next

नागभीड : नागभीड आणि कोटगाव रेल्वे फाटकावरुन सुरू असलेली लोकांची अवागमन रेल्वे बंद करणार आहे. रेल्वेकडून ही कारवाई गुरुवारी करण्यात आली. पण तहसीलदार समीर माने यांनी मध्यस्थी करून नागरिकांना दिलासा दिला.
नागभीड-नागपूर रेल्वे मार्गावर फाटक आहेत. एक फाटक येथील समता कॉलनीजवळ आहे. तर दुसरी फाटक बोथली दरम्यान आहे. नागभीड येथील अनेकांची शेती या फाटकापलिकडे चिखलपरसोडी शिवारात आहे. त्यामुळे येथील शेतकऱ्यांना रोज ही फाटक पार करून ये-जा करावे लागते. तर चिखलपरसोडीचे नागरिकही याच रस्त्याचे रोजच नागभीडला येतात. लोकांच्या सोयीसाठी पक्का रस्ता सुद्धा येथून तयार करण्यात आला आहे. कोटगाव फाटकाबाबतही असेच आहे. बोथली परिसरातील नागरिक येथूनच जातात.गुरुवारी सकाळी रेल्वने फाटक बंद करण्याची कारवाई सुरू केली असता, शेतकऱ्यांनी तहसीलदारांकडे तक्रार केली. तहसीलदार माने लगेच घटनास्थळी दाखल झाले व फाटक बंद करण्याचे रेल्वेचे काम बंद पाडले. लगेच त्यांची कोटगाव रेल्वे फाटकालाही भेट दिली आणि तेथे सुरू असलेले फाटक बंद करण्याचे काम बंद केले. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: An attempt to stop the Nagabhid-Kotgaan Railway Gate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.