आमदारांसह उपस्थितांनी घेतली पर्यावरण रक्षणाची प्रतिज्ञा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2021 04:21 AM2021-06-06T04:21:26+5:302021-06-06T04:21:26+5:30

राजुरा : जागतिक पर्यावरण दिन आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून राजुरा शहरातील तालुका ...

Attendees, including MLAs, pledged to protect the environment | आमदारांसह उपस्थितांनी घेतली पर्यावरण रक्षणाची प्रतिज्ञा

आमदारांसह उपस्थितांनी घेतली पर्यावरण रक्षणाची प्रतिज्ञा

googlenewsNext

राजुरा : जागतिक पर्यावरण दिन आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून राजुरा शहरातील तालुका क्रीडा संकुल परिसरात आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी जिल्हा कॉंग्रेस पर्यावरण विभागाच्या जिल्हाध्यक्ष स्वाती धोटे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी सर्वांनी पर्यावरण रक्षण आणि संवर्धनाची प्रतिज्ञा घेतली.

जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या पर्यावरण विभागाने महाराष्ट्रात एक लाख वृक्षारोपणाचा संकल्प केला आहे. वृक्षारोपण कार्यक्रमाप्रसंगी नगराध्यक्ष अरुण धोटे, उपनगराध्यक्ष सुनील देशपांडे, काँग्रेसच्या पर्यावरण विभाग जिल्हाध्यक्ष स्वाती धोटकर, छाया बरडे, वर्षा बोरकर, प्रणिता बोरकर, स्वाती बच्चुवार, सोनाली हेडाऊ, अभिलाषा मेदंळकर, कांता दखने, प्रीती देखणे, योगिता धनेवार, स्वप्नाली देखणे, वैशाली भागवत, महेश किन्नाके, जीवनदीप सर्पमित्र पर्यावरण बहुद्देशीय संस्था राजुराचे अध्यक्ष प्रवीण लांडे, सचिव रत्नाकर पचारे, उपाध्यक्ष संदीप आदे, तुषार खोके, विजय पचारे, राहुल दुबे, सचिन खाडे आदी उपस्थित होते.

Web Title: Attendees, including MLAs, pledged to protect the environment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.