पोलीस निरीक्षकांच्या बदल्यानंतर उपनिरीक्षकांच्या बदल्यांकडे लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2017 11:21 PM2017-09-20T23:21:17+5:302017-09-20T23:21:34+5:30
चंद्रपूरच्या पोलीस अधीक्षक नियती ठाकर यांनी पोलीस प्रशासनात सुसुत्रता यावी यासाठी जिल्ह्यातील आठ पोलीस निरीक्षकाच्या बदल्या करून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला.
लोकमत न्यूज नेटवर्क
मूल : चंद्रपूरच्या पोलीस अधीक्षक नियती ठाकर यांनी पोलीस प्रशासनात सुसुत्रता यावी यासाठी जिल्ह्यातील आठ पोलीस निरीक्षकाच्या बदल्या करून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. अचानक झालेल्या बदलीने पोलीस निरीक्षकासोबतच जनतेला सुद्धा आश्चर्य वाटले. आता हाच बदल उपनिरीक्षकांच्या बदल्यांतून दिसून येणार काय, याकडे नागरिकांचे लक्ष लागून आहे.
तालुक्यातील ठिकाणावर बदल हवा यासाठी पोलीस अधीक्षकांनी केलेल्या बदल्या सर्वांना स्वागर्ताह असला तरी ऐन नवरात्रीत झालेल्या बदलाने पोलीस निरीक्षकांना जनतेशी जुळवून घेण्यास व योग्य घडी नीट बसविण्यात अवधी लागणार आहे. पोलीस निरीक्षकांच्या बदल्यानंतर पोलीस उपनिरीक्षकांच्या देखील बदल्या व्हाव्यात, असा सूर जनतेद्वारा उमटत आहे. याचे कारणही तसेच असून बढती झाल्यानंतर एकाच ठाण्यात ठाण मांडून बसणारे महाभाग मूल बरोबरच इतरही ठाण्यात आहेत. एकाच ठिकाणी वावरत असल्याने त्यांची पकड इतर अवैध धंदे करणाºयांसोबत चांगली जमल्याचे दिसून येते.
पोलीस निरीक्षकांच्या बदल्या सर्वांना अचंबित करणाºया ठरल्या. या बदल्यावरुन नेहमी उन्हाळ्यामध्ये होणाºया बदल्यांना फाटा देत अवेळी बदल्या केल्याने सर्वांची भंबेरी उडाली. मात्र सर्वानी स्वत:ला सावरत वरिष्ठांचा आदेश मानत कामावर रूजू झाले.
पोलीस प्रशासनात सूसत्रता आणण्यासाठी पोलीस अधीक्षकांनी उचललेले पाऊन कौतुकास्पद आहे. मात्र अवैध काम करणाºया काहींना अस्वस्थ तर काहींच्या चेहºयावर हास्य फुलले आहे. ज्या ठाणेदारांनी अवैध धंदे करणाºयांवर जबर बसवले त्यांना ते ठाणेदार नको होते. काहीशी मैत्रीचे संबंध निर्माण झाले त्यांना ठाणेदार हवे होते. मात्र ‘विंचवाचं बिºहाड पाठीवर’ या उक्तीप्रमाणे अधिकाºयांची बदली ठरली असल्याने त्यांचे बिºहाड पाठीवरच असते, हेच यावरुन दिसून येते.
मूलमध्ये पोलीस उपनिरीक्षक ठाण्यातच मुक्कामाला आहेत की काय, असा भास होताना दिसतो. शिपायांपासून तर पोलीस उपनिरीक्षकापर्यंतचे अनेक जण याच ठाण्यात अथवा परिसरात फिरत असल्याने अवैध धंदे करणाºयांच्या ‘नाड्या’ त्यांना माहित आहेत. त्यामुळे केव्हा नाड्या दाबावच्या याची माहिती असल्याने त्याचा फायदा पोलीस उपनिरीक्षकांना होत असल्याचे दिसून येते. त्यामुळे पोलीस उपनिरीक्षकांच्याही बदल्या कराव्यात.