कोदेपुरातील पाणीटंचाईकडे वेधले लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2017 12:16 AM2017-10-25T00:16:47+5:302017-10-25T00:17:02+5:30
गावखेड्यातील मूलभूत सुविधा पुरविण्यात हयगय केल्यास गावखेड्यांतील महिला कशी एल्गार पुुकारु शकते, याचा प्रत्यय कोदेपार येथे आला.
घनश्याम नवघडे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागभीड : गावखेड्यातील मूलभूत सुविधा पुरविण्यात हयगय केल्यास गावखेड्यांतील महिला कशी एल्गार पुुकारु शकते, याचा प्रत्यय कोदेपार येथे आला. एरव्ही शांत असलेल्या परंतु, मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या पाणी टंचाईने त्रस्त झालेल्या महिलांनी हा प्रश्न पदाधिकाººयांना लक्षात आणून दिल्याने परिसरात चर्चेचा विषय ठरला आहे. महिलाही आता समोर येऊ लागल्या. आपल्या समस्या मांडू लागल्या आहेत, हें या घटनेतून सिद्ध झाले.
तालुक्यातील कोदेपार येथे ३० ते ३५ ारांची लोकवस्ती. हीवस्ती मिंडाळा ग्रामपंचायतीअंतर्गत येते. या वस्तीत तीन-चार विंधन विहिरी असल्या तरी सर्व बिनकामाच्या झाल्या आहेत. ग्रामपंचायतीची पाणीपुरवठा योजना अनेक वर्षापासून रखडली आहे. त्यामुळे या संपूर्ण वस्तीची मदार चौकातील एकाच विंधन विहिरीवर आहे. संपूर्ण वस्ती याच एका विंधन विहिरीवरुन पाणी भरत असल्याने पाण्याची पातळी खोल गेली आहे. परिणामी, एक बादलीभर पाणी काढण्यासाठी कोदेपार येथील महिलांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. या गावातील महिलांना जागृत करण्यासाठी बचतगटांचा उपयोग होऊ शकतो. परंतु, त्यादृष्टीने प्रयत्न होताना दिसत नाही. शेतीमध्ये पुुरुषांच्या खांद्याला खांदा लावून राबणाºया महिलांना सामाजिक व आर्थिक संकटांची झळ लागल्याने त्या आता बोलू लागल्या आहेत. गावातील मूलभूत समस्या सोडविण्यासाठी लोकप्रतिनिधींसमोर धाडसाने प्रश्न मांडू लागल्या. कारण त्याशिवाय पर्याय नाही, हे आता कोदेपार महिलांना वाटत आहे.
शुक्रवारी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आणि विद्यमान गटनेते डॉ. सतीश वारजूकर हे एका कुटुंबाच्या सात्वनासाठी कोदेपारला गेले असता सहा-सात महिला याच विंधन विहिरीवर पाणी भरत होत्या. त्यातील एका महिलेने बोरींग पाणी भरण्यासाठी कशा अडचणींचा सामना करावा लागतो, याकडे लक्ष वेधले. त्यानंतर अन्य महिलांनीही या प्रश्नाची गांर्भियता पदाधिकाºयांच्या लक्षात आणून दिली साहेब, बघा आम्हाला किती त्रास होतो, या शब्दात आपली समस्या मांडली. गावात तीन-चार बोअरींग असल्या तरी त्या कामाच्या नाहीत. याच बोअरींगचे पाणी संपूर्ण गाव वापरते. आम्ही अनेकांना या बोअरींगविषयी सांगितले. ग्रामपंचायतीला माहिती देऊनही काही कार्यवाही झाली नाही, याविषयी खंत व्यक्त केली. डॉ. सतीश वारजूकर यांनी त्या महिलांची समस्या शांतपणे ऐकून घेतली. मागणी लवकरच पूर्ण होईल. एवढेच नाही तर येत्या मार्चपर्यंत एका नवीन नळासाठी स्वत: पाठपुरावा करतो, अशी हमी दिली. मार्चपर्यंत नवीन नळ मंजूर झाली नाही तर एप्रिलमध्ये स्वत:कडून नवीन नळ करून देणार, अशी ग्वाही दिल्यानंतर महिलांनी समाधानाचा सुटकारा सोडला.