कॅन्सरग्रस्त युवकाच्या मदतीसाठी आॅटो संघटनेचा पुढाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 26, 2018 12:34 AM2018-01-26T00:34:12+5:302018-01-26T00:34:25+5:30

कॅन्सरग्रस्त आॅटो चालकाला उपचारासाठी आर्थिक मदत करण्यासाठी सावलीतील आॅटो संघटनेने पुढाकार घेतला आहे. दरम्यान सावली येथील आॅटो संघटनेने शहरात आर्थिक मदत रॅली काढून २० हजार रुपयांचा जवळपास निधी गोळा करुन तो निधी सुभाष मॅकलवारला सुर्पद केला.

Auto Association Initiative To Help Infected Youth | कॅन्सरग्रस्त युवकाच्या मदतीसाठी आॅटो संघटनेचा पुढाकार

कॅन्सरग्रस्त युवकाच्या मदतीसाठी आॅटो संघटनेचा पुढाकार

Next
ठळक मुद्देसावलीत आर्थिक मदत रॅली : मदत करण्याचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्क
सावली : कॅन्सरग्रस्त आॅटो चालकाला उपचारासाठी आर्थिक मदत करण्यासाठी सावलीतील आॅटो संघटनेने पुढाकार घेतला आहे. दरम्यान सावली येथील आॅटो संघटनेने शहरात आर्थिक मदत रॅली काढून २० हजार रुपयांचा जवळपास निधी गोळा करुन तो निधी सुभाष मॅकलवारला सुर्पद केला.
सावली तालुक्यातील चारगाव येथील युवक सुभाष शिवराम मॅकलवार (३५) सावली ते मूल या महामार्गावर आॅटोरिक्षा चालवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. काही दिवसांपूर्वी सुभाषच्या गालाला एक लहानसा फोड झाला. त्याची तपासणी केली असता, सुभाषला कर्करोग झाल्याचे उघडकीस आले. मात्र घरची आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळे उपचार कसा करावा, असा प्रश्न निर्माण सुभाषपुढे निर्माण झाला. याबाबतची माहिती आॅटो संघटनेच्या पदाधिकाºयांना होताच संघटनेने बैठक घेउन आपापल्या परिने मदत करण्याचा निर्णय घेतला. मात्र तो निधी तोडका पडत असल्याने गावातून रॅलीच्या माध्यमातून रक्कम जमा करण्याचा निर्णय घेऊन आर्थिक मदत रॅली काढली. या रॅली जमा झालेला निधी सुभाषच्या सुर्पद करण्यात आला. यावेळी आॅटो संघटनेचे अध्यक्ष दीपक लाजगाये, उपाध्यक्ष मारोती लासरवार, मार्गदर्शक नंदू व्यास, इमरान शेख, महेश दुधे, गुलशन जगताप, प्रमोद लोनारे, खंडू गोंगले, कैलाश बेजगमवार, संजय सातपुते, सिद्धार्थ रामटेके, सलीम कुरेशी, विनोद पिंपळकर, सुनिल कामडी, जगदिश वाढई आदी उपस्थित होते.
सुभाषला उपचारासाठी आणखी मदतीची गरज असल्याने सावलीतील बँक आॅफ महाराष्ट्र शाखा सावलीच्या खात्यामध्ये (६०२८२२१५८६९) रक्कम जमा करण्याचे आवाहन आॅटो संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.

Web Title: Auto Association Initiative To Help Infected Youth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.