नूतनीकरणाच्या नावावर आॅटो चालकांची लूट

By admin | Published: July 6, 2016 01:17 AM2016-07-06T01:17:44+5:302016-07-06T01:17:44+5:30

शहरातील सुशिक्षित बेरोजगार स्वयंरोजगार म्हणून आॅटोरिक्षा चालविणाच्या व्यवसाय करतात. त्यांच्या जुन्या आॅटोरिक्षाचे नूतनीकरण करण्यासाठी रक्कम निर्धारित करण्यात आली.

Auto robbery plunder in the name of renovation | नूतनीकरणाच्या नावावर आॅटो चालकांची लूट

नूतनीकरणाच्या नावावर आॅटो चालकांची लूट

Next

दंड आकारणी : विदर्भ आॅटोरिक्षा कामगार संघटनेचा विरोध
चंद्रपूर : शहरातील सुशिक्षित बेरोजगार स्वयंरोजगार म्हणून आॅटोरिक्षा चालविणाच्या व्यवसाय करतात. त्यांच्या जुन्या आॅटोरिक्षाचे नूतनीकरण करण्यासाठी रक्कम निर्धारित करण्यात आली. ती रक्कम भरल्यानंतरही आॅटो चालकांना दोन वेळा पुन्हा अतिरिक्त रक्कम भरण्याचे आदेश देण्यात आले. वारंवार होणाऱ्या दंड वसुलीला विरोध करुन आढावा घेऊन एकच निश्चित रक्कम ठरविण्याची मागणी करण्यात आली आहे.
आॅक्टोबर, नोव्हेंबर व डिसेंबर २०१५ मध्ये जुने आॅटोरिक्षा परवाना नूतनीकरण करण्यासाठी प्रत्येक आॅटारिक्षासाठी १५ हजार रुपये रक्कम घेण्यात आले. त्याच्या २६ दिवसानंतर १५ हजार ऐवजी १५०० रुपये घेऊन नूतनीकरण शुल्क, मासिक दंड, टॅक्स, चालान दंड आदी रक्कमेची वसूली करुन परवाने नूतनीकरण करण्यात आले. एकाएकी मोठ्या प्रमाणात रक्कम वाढवून आॅटोरिक्षा कामगारांना प्रवाशांची सेवा व रोजगारापासून वंचित करण्यात येत आहे. आॅटोरिक्षा हा तुटपूंजीवर चालणारा उपक्रम असल्यामुळे शासनाने विदर्भातील आॅटोरिक्षा रोजगारांच्या मिळकतीचा आढावा घेऊन दंड रक्कम ठरविण्याची मागणी संघटनेचे अध्यक्ष मोक्षवीर लोहकरे, कैलास धामने, मधुकर गुजरकर, शेख अब्बास भाई, बाळू उपलंचीवार, रवींद्र मालेकर, जहीर शेख, बंडू भगत, शंकर धुमाळे, श्रीनिवास सुदाला, मोहसीन हुसेन, प्रभाकर होकम, मोतीलाल करुणाकर, रमेश पुलिपाका, विपीन झाडे, मोतीलाल गावंडे, अशोक काळे, कृष्णा कामपेल्ली, बक्शी ठाकरे यांनी केली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Auto robbery plunder in the name of renovation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.