ट्रकच्या धडकेत आॅटोचालक ठार

By Admin | Published: November 13, 2016 12:38 AM2016-11-13T00:38:59+5:302016-11-13T00:38:59+5:30

चंद्रपूरहून भाजीपाला भरलेला ट्रक आलापल्लीकडे जात असताना विरूद्ध दिशेने टोचन लावून येणाऱ्या आॅटोला जोरदार धडक बसली.

Autor kills truck driver | ट्रकच्या धडकेत आॅटोचालक ठार

ट्रकच्या धडकेत आॅटोचालक ठार

googlenewsNext

तामलवाडी : संगणकीय प्रणालीत बिघाड झाल्याने तामलवाडी येथील महाराष्ट्र बँकेचे कामकाज शनिवारी दिवसभर बंद होते. नोटा जमा करण्यासाठी तिसऱ्या दिवशी या भागातील १० गावांचे ग्राहक आले होते. मात्र तांत्रिक बिघाडाचा फलक वाचून त्यांनाही परत जावे लागले. बँकेचे शटर दिवसभर डाऊन असल्याने ग्राहकात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
हजार-पाचशेच्या नोटा चलनातून रद्दबातल ठरविल्यानंतर शनिवारी तिसऱ्या दिवशी ग्राहकांनी तामलवाडी येथील महाराष्ट्र बँकेसमोर नोटा जमा करण्यासाठी गर्दी केली होती. मात्र संगणकीय प्रणालीत बिघाड झाल्याचे बँक अधिकाऱ्यांच्या लक्षात येताच सकाळी १० वाजता तांत्रिक बिघाडाचा फलक दरवाजाला अडकविला. शनिवारी एकही हजार-पाचशेच्या नोट बँकेने स्वीकारली नाही. या भागातील गोंधळवाडी, सांगवी (काटी), पांगरधरवाडी, सुरतगाव, पिंपळा (बु), वडगाव (काटी), गंजेवाडी, तामलवाडी, देवकुरुळी, पिंपळा (खुर्द) येथल ग्राहक सर्व कामे सोडून तामलवाडी येथे आले होते. मात्र कामकाजच बंद असल्याने बँकेसमोर वृद्ध महिला, पुरुष उपाशीपोटी दिवसभर भरून हॉटेलमध्ये नाश्ता, चहा पिण्यासाठी जवळ चिल्लर पैसे नव्हते. त्यामुळे ग्राहकांची तारांबळ उडाली. उसनवारी चिल्लर पैसे घेऊन बँक गाठली होती, तरीपण तिसऱ्या दिवशी ग्राहकांची घोर निराशा झाली. दुपारी ३ वाजता संगणक दुरुस्तीसाठी अभियंत्यास बँकेत पाचारण केले. त्यासही हा दोष निघाला नाही. त्यामुळे दिवसभर कामकाज ठप्प होते.
नव्या नोटा आल्या नाहीत
शनिवारी तिसऱ्या दिवशी नवीन २ हजार रुपयांच्या नोटा ग्राहकांना हाती पडतील अशी अपेक्षा होती; त्यासाठी शुक्रवारी ग्राहकांकडून विड्रॉल स्लीपही भरून घेण्यात आल्या. मात्र, नव्या नोटा काही हाती पडल्या नाहीत, तर इतर १००, ५०, १० रुपयांचा नोटांचाही तुटवडा निर्माण झाल्यामुळे सलग तिसऱ्या दिवशी नागरिकांना सर्व व्यवहार उधारीवर करावे लागले.

Web Title: Autor kills truck driver

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.