दहावीचा भूगोलाचा पेपर न घेता सरासरी गुण देण्यात यावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2020 09:37 PM2020-04-09T21:37:16+5:302020-04-09T21:38:25+5:30

लॉकडाउनमुळे इयत्ता दहावीचा भूगोल विषयाचा जो पेपर राहिला आहे, तो न घेता विद्यार्थ्यांना सरासरी गुण देण्यात यावे, अशी मागणी माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांच्याकड़े केली आहे.

The average score should be given without taking the geography paper of class X | दहावीचा भूगोलाचा पेपर न घेता सरासरी गुण देण्यात यावे

दहावीचा भूगोलाचा पेपर न घेता सरासरी गुण देण्यात यावे

Next
ठळक मुद्देसुधीर मुनगंटीवार यांची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : कोरोना विषाणुच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या लॉकडाउनमुळे इयत्ता दहावीचा भूगोल विषयाचा जो पेपर राहिला आहे, तो न घेता विद्यार्थ्यांना सरासरी गुण देण्यात यावे, अशी मागणी माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांच्याकड़े केली आहे. सदर प्रकरणी येत्या चार दिवसात सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन ना. वर्षा गायकवाड यांनी दिले आहे.
दहावीचा भुगोलाचा पेपर २१ मार्च २०२० रोजी घेण्यात येणार होता, मात्र कोरोना विषाणुच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे हा पेपर रद्द करण्यात आला. आता तर लॉकडाऊनमुळे व कोरोनाग्रस्तांच्या वाढत्या संख्येमुळे हा पेपर सध्या घेणे शक्यसुद्धा नाही. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होवू नये, या दृष्टीकोनातून हा पेपर रद्द करून सरासरी गुण देण्यात यावे, अशी भूमिका आ . मुनगंटीवार यांनी प्रा. वर्षा गायकवाड यांच्याशी दूरध्वनीद्वारे झालेल्या चर्चेदरम्यान केली. या मागणीच्या अनुषंगाने सकारात्मक कार्यवाही करण्याचे आश्वासन प्रा. वर्षा गायकवाड यांनी दिले.

Web Title: The average score should be given without taking the geography paper of class X

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.