कृत्रिम टंचाईवर आळा घाला

By admin | Published: May 22, 2014 11:44 PM2014-05-22T23:44:34+5:302014-05-22T23:44:34+5:30

खरीप हंगामासाठी खते व बियाणे मुबलक उपलब्ध असले तरी शेतकरी कृषी निविष्ठाची उचल करतात, त्या काळात खते व बियाणांची कृत्रिम टंचाई व लिंकिंग होणार नाही, याची दक्षता घ्या,

Avoid artificial scarcity | कृत्रिम टंचाईवर आळा घाला

कृत्रिम टंचाईवर आळा घाला

Next

 आढावा बैठक : पालकमंत्री यांच्या सूचना

चंद्रपूर: खरीप हंगामासाठी खते व बियाणे मुबलक उपलब्ध असले तरी शेतकरी कृषी निविष्ठाची उचल करतात, त्या काळात खते व बियाणांची कृत्रिम टंचाई व लिंकिंग होणार नाही, याची दक्षता घ्या, अशा सूचना पालकमंत्री संजय देवतळे यांनी कृषी विभागाला दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित खरीप आढावा बैठकीत ते बोलत होते. आमदार शोभाताई फडणवीस, जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर, जि.प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी आशुतोष सलील, जि.प. चे कृषी अरुण निमजे, अप्पर जिल्हाधिकारी सी.एस. डहाळकर, कृषी सहसंचालक विजय घावटे व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ.डी.एल. जाधव यावेळी उपस्थित होते. कृषी विभागाने मागील वर्षी खते व बियाण्यांचे योग्य नियोजन केल्याचे सांगून पालकमंत्री म्हणाले, यावर्षीही शेतकर्‍यांना खते व बियाणे वेळेवर उपलब्ध व्हावे, असे नियोजन करा, त्याचप्रमाणे शेतकर्‍यांना कर्ज उपलब्ध व्हावे, अशा सूचना त्यांनी दिल्या. हवामान खात्याच्या अंदाजानुसार यावर्षी पाऊस कमी असून अशा परिस्थितीत कृषी विभागाने शेतकर्‍यांना योग्य मार्गदर्शन करून पीक परिस्थितीबाबत जागृत करावे, असा सल्लाही त्यांनी दिला. सोयाबीनचा अपवाद वगळता बियाणे मुबलक उपलब्ध असले तरी शेतकर्‍यांनी आपल्याकडील बियाणेही वापरावे, असे त्यांनी सांगितले. राष्टÑीय कृषी विमा योजनेचा लाभ जास्तीत जास्त शेतकर्‍यांना मिळावा यासाठी कृषी विभागाने पुढाकार घ्यावा असेही ते म्हणाले. या खरीप हंगामात १ लाख ७९ हजार हेक्टरवर खरीप भाताची, १ लाख २५ हजार हेक्टरवर सोयाबिन तर १ लाख २० हजार हेक्टरवर कापसाची पेरणी होईल, असे कृषी विभागाच्या वतीने सांगण्यात आले. सर्व पिकांची पेरणी ४ लाख ६९ हजार हेक्टरवर होणार असल्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. डी.एल. जाधव यांनी सांगितले. महाबीज व खासगी असे १ लाख ६ हजार क्विंटल बियाण्याची आवश्यकता असून प्राप्त साठा १ लाख ४ हजार २४० क्विंटल असल्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जाधव म्हणाले. या हंगामात जास्तीत जास्त उत्पादन वाढावे यासाठी कृषी विभाग प्रयत्नशिल असल्याचेही त्यांनी सांगितले. या बैठकीत माजी मालगुजारी तलाव, राष्टÑीय कृषी विमा योजना, विद्युत विभागाचे पेडपेंडींग, गारपीटग्रस्तांना मदत, खते व बियाण्यांची उपलब्धता व बँकेचे कर्ज आदी विषयावर उपस्थित सदस्यांनी चर्चा केली. शेतकर्‍यांना मार्गदर्शन करणारे पोस्टर कृषी विभागाच्या वतीने तयार करण्यात आले असून त्याचे प्रकाशन पालकमंत्री संजय देवतळे यांच्या हस्ते या बैठकीत करण्यात आले. बैठकीनंतर जिल्हा परिषदेचे कृषी अधिकारी पी.डी. देशमुख यांनी उपस्थितांचे आभार मानले. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Avoid artificial scarcity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.