पावसापासून वाचण्यासाठी ते चहाच्या टपरीवर थांबले आणि अघटित घडले...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2020 11:44 AM2020-07-14T11:44:16+5:302020-07-14T11:46:10+5:30
सावरगाव, वलनी परिसरात विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडला. वलनी हद्दीतील कोजबी फाट्याजवळील वडाच्या झाडाखाली असलेल्या चहा टपरीच्या झोपडीत काही जण पावसापासून बचावासाठी उभे होते. दरम्यान...
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : नागभीड तालुक्यातील वलनी येथील कोजबी फाट्यावर असलेल्या वडाच्या झाडाखालील चहा टपरीच्या झोपडीत पावसापासून बचाव करीत थांबले असताना अचानक वीज कोसळली. यात दोघांचा मृत्यू झाला तर तीन जख जखमी झाले आहेत. मृतकामध्ये एका १२ वर्षीय मुलाचाही समावेश आहे. ही घटना सोमवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास घडली.
अशोक कोंडुजी तिरमारे (४५) रा. वलनी व लोकचंद रामू पोहनकर (१२) रा. सोनुली ता. नागभीड अशी मृतकांची नावे आहेत. याशिवाय सुनील श्यामराव बोरकर (३०) रा. गिरगाव, मोरेश्वर दयाराम मडावी रा. वलनी, गोपीचंद वासेकर रा. वलनी हे जखमी असून त्यांना नागभीड येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सावरगाव, वलनी परिसरात विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडला. दरम्यान वलनी हद्दीतील कोजबी फाट्याजवळील वडाच्या झाडाखाली असलेल्या चहा टपरीच्या झोपडीत अशोक तिरमारे, लोकचंद पोहनकर व अन्य काही जण पावसापासून बचावासाठी उभे होते. दरम्यान, वीज सरळ झोपडीवरच कोसळली. यात अशोक तिरमारे व लोकचंदचा जागीच मृत्यू झाला. अन्य तिघे जखमी झाले.