अंधश्रध्दा टाळा, गणेश मंडळात झळकले बॅनर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2021 04:32 AM2021-09-12T04:32:46+5:302021-09-12T04:32:46+5:30

गोंडपिपरी : चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती आणि नागभीड तालुक्यात जादुटोणा केल्याच्या संशयावरून अमानुष मारहाण झाली. या घटनांनी जिल्हा हादरला. जिल्ह्यात ...

Avoid superstition, banners flashed in Ganesh Mandal | अंधश्रध्दा टाळा, गणेश मंडळात झळकले बॅनर

अंधश्रध्दा टाळा, गणेश मंडळात झळकले बॅनर

Next

गोंडपिपरी : चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती आणि नागभीड तालुक्यात जादुटोणा केल्याच्या संशयावरून अमानुष मारहाण झाली. या घटनांनी जिल्हा हादरला. जिल्ह्यात अंधश्रध्दा वाढीस लागली. मानवी मेंदूत भिनलेली अंधश्रध्दा दूर करण्यासाठी गणेश मंडळे आता पुढे सरसावली आहेत. अंधश्रध्दा निर्मूलन कायद्याची माहिती देणारे बॅनर गणेश मंडळांनी लावले. कार्टून चित्राचा वापर करीत तयार केलेले बॅनर भक्ताचे लक्ष वेधत आहेत.

चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुक्यात जादुटोण्याच्या संशयावरून अमानुष मारहाणीचा प्रकार पुढे आला. या प्रकाराने पुरोगामी महाराष्ट्र हादरला. हे प्रकरण ताजे असतानाच नागभीड तालुक्यात जादूटोणा केल्याचा संशय घेत मारहाण झाली. एकविसाव्या शतकातही मानवी मेंदूत अंधश्रध्दा भिनली असल्याचा प्रत्यय या दोन घटनांनी दिला. ग्रामीण,शहरी भागात बुवाबाजी करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. सन 2013 मध्ये शासनाने अंधश्रध्दा निर्मूलन कायदा अमलात आणला.मात्र या कायद्याची माहिती नसल्याने बुवाबाजीचा नादी सर्वसामान्य माणूस लागत आहे. अशात धाबा उपपोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या गावातील गणेश मंडळानी अंधश्रध्दा निर्मूलन कायद्यातील कलमाची माहिती देणारे बॅनर झळकविले आहेत.

110921\screenshot_2021-09-11-08-56-31-73.jpg

अंधश्रध्दा

Web Title: Avoid superstition, banners flashed in Ganesh Mandal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.