उन्हाळ्यात मायग्रेनपासून दूर राहण्यासाठी हे टाळा ! रुग्णांनो ही काळजी घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2025 15:22 IST2025-03-13T15:21:26+5:302025-03-13T15:22:22+5:30

Chandrapur : अति मोबाईल वापराने १० ते १५ वर्षातील मुलांनाही मायग्रेनचा आस जाणवत आहे

Avoid these things to stay away from migraines in summer! Patients, take care of these things | उन्हाळ्यात मायग्रेनपासून दूर राहण्यासाठी हे टाळा ! रुग्णांनो ही काळजी घ्या

Avoid these things to stay away from migraines in summer! Patients, take care of these things

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर :
तप्त उन्हाच्या झळा या मेंदूलासुद्धा बसत असतात. त्यामुळे मायग्रेनची समस्या उद्भवू शकते. त्यामुळे उन्हात बाहेर पडताना काळजी घेणे गरजेचे असल्याचा सल्ला मानसिकरोगतज्ज्ञ डॉ. विवेक बांबोळे यांनी दिला आहे.


उन्हाळा म्हटला की सुट्टीचाही मोसम. अनेकजण सहलीचे नियोजन करतात. सर्वत्र आनंदाला उधाण आलं असते. परंतु, उन्हाळ्यातील तापमान वाढीच्या त्रासाकडे दुर्लक्ष करणे धोक्याचे ठरू शकते. विशेषतः उन्हाचा मेंदूवरही परिणाम होऊन मायग्रेनसारखी समस्या होण्याची शक्यता असते.


जास्तवेळ उपाशी राहणे टाळावे
मायग्रेनची समस्या असेल तर जास्त वेळ उपाशी राहणे टाळावे, अध्येमध्ये काहीतरी खावे, चाकलेट खाणे टाळावे, चहा-कॉफी घेणेही टाळावे. यासोबतच थंड व आंबट पदार्थ खाणे टाळावे, बाहेरचे सॅन्डविच असे पदार्थ खाणे टाळावे.


उन्हाळ्यात मायग्रेनचा जास्त त्रास
तप्त उन्हाचा शरीरावर परिणाम जास्त होतो. तप्त उन्हाने डोके तापत असते. त्यामुळे मेंदूला रक्तप्रवाह करणाऱ्या रक्त वाहिन्यांमधील अतिसंवेदनशीलता यामुळे होतो. परिणामी उन्हाळ्यात मायग्रेनचा त्रास अधिक जाणवत असतो. 


मायग्रेनची कारणे काय?
प्रखर सूर्यप्रकाश, खूप मोठा आवाज, तीव्र वास, अॅसिडिटी, चुकीची व कमी झोप घेण्याची पद्धती, थंड पाण्याने अंघोळ करणं, उपवास, अतिश्रम, स्त्रियांमध्ये मासिक पाळीचा कालावधी, घट्ट वेणी बांधणं, डिहायड्रेशन, चहा कॉफीचे सेवन, चॉकलेट, सँडविच खाणे ही या आजाराची प्रमुख कारणे आहेत.


मायग्रेनपासून दूर राहण्यासाठी हे टाळा
सुदृढ आरोग्यासाठी पुरेशी झोप आवश्यक आहे. दररोज कमीत-कमी सात ते आठ तास झोप घ्यावी.


"बदलत्या जीवनशैली आणि तणामुळे ही समस्या उ‌द्भवते. त्यामुळे ताण-तणाव न घेता आनंदी जीवनशैली अनुसरावी. पुरेश झोप घ्यावी, तीव्र सूर्यप्रकाशात जाणे टाळावे, निरोगी आणि फायबरयुक्त आहार घेण्याचा प्रयत्न करावा, जेवणात आंबट, थंड व तेलकट पदार्थ टाळावे, सतत डोके दुखत असेल तर तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा."
- डॉ. विवेक बांबोळे, मानसिकरोगतज्ज्ञ.

Web Title: Avoid these things to stay away from migraines in summer! Patients, take care of these things

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.