मनपाने अनावश्यक खर्चाला आळा घालावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2017 12:08 AM2017-10-27T00:08:06+5:302017-10-27T00:08:20+5:30

शहराच्या विकासासाठी मनपाने निधीची तरतूद केली. काही कामे सुरू आहेत. मात्र, बºयाच ठिकाणी अनावश्यक खर्च होत असून, या प्रकाराला आळा घालावा, ....

Avoid unnecessary expenditure on the budget | मनपाने अनावश्यक खर्चाला आळा घालावा

मनपाने अनावश्यक खर्चाला आळा घालावा

Next
ठळक मुद्देमागणी : पालकमंत्र्यांना काँग्रेस नगरसेवकांचे निवेदन सादर

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : शहराच्या विकासासाठी मनपाने निधीची तरतूद केली. काही कामे सुरू आहेत. मात्र, बºयाच ठिकाणी अनावश्यक खर्च होत असून, या प्रकाराला आळा घालावा, अशी मागणी चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नंदु नागरकर, माजी प्रदेश सचिव तथा नगरसेविका सुनिता लोढीया, असंघटीत कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष विनोद संकत, नगरसेवक अमजद अली, घनश्याम वासेकर, गौतम चिकाटे, श्याम राजुरकर, राजेंद्र आत्राम, वकार काझी, हरिदास लांडे, वैभव बानकर आदींनी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे केली.
शिष्टमंडळाने विश्रामगृहात शहरातील विविध समस्यांवर चर्चा करून पालकमंत्र्यांचे लक्ष वेधले. महानगरपालिकाद्वारे डोअर-टू-डोअर कचरा जमा करण्यासाठी वार्षिक ५१ लाख खर्च केला जात आहे. हा खर्च ३६ लाख २१ हजार ४७९ रुपयांपेक्षा अधिक नाही. यातून वार्षिक २ कोटींचे नुकसान होत आहे. त्यासंदर्भात उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करून महानगरपालिकेने हे प्रकरण तीन सदस्यीय समितीसमक्ष ठेवून होणाºया खर्चाचे अवलोकन करावे. मनपाअंतर्गत घनकचरा डोअर-टू-डोअर जमा करावा. हा कचरा झंडी ते कंपोस्ट डेपोपर्यंत नेण्यासाठी ५२० महानगरपालिका कर्मचारी ज्यांचा वार्षिक खर्च पगाराच्या रुपाने रुपये १६ कोटी आहे. २२४ खाजगी कर्मचारी ज्यांचा खर्च रुपये ३.८० कोटी, डोर-टू-डोर कचरा जमा करण्यासाठी रुपये ६ कोटी, तसेच झंडी ते कंपोस्ट डेपो कचरा नेण्यासाठी रुपये ४ कोटी खर्च करण्यात येत आहे. एकूणच वार्षिक ३० कोटी रुपये महानगरपालिका खर्च करीत आहे. त्यामुळे प्रकरणाची दखल घेऊन नियमांपेक्षा जास्त होणारा खर्च कमी करून समस्येवर तोडगा काढावा, अशी मागणी शिष्टमंडळाने केली. शहरातील नवीन बांधकाम परवानगीसाठी महापालिकेने धोरण तयार करावे, खुल्या जागेवर अतिक्रमण करण्यास पायबंद घालावा, स्थायी समितीच्या सभापतींना तसे निर्देश द्यावे, अशी मागणीही केली आहे.

Web Title: Avoid unnecessary expenditure on the budget

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.