जंगलव्याप्त परिसरात फिरणे टाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2021 04:24 AM2021-01-04T04:24:04+5:302021-01-04T04:24:04+5:30

कोरोनाच्या संकटात डासांचा डंख चंद्रपूर : मागील काही दिवसांपासून शहरात मोठ्या प्रमाणात डासांचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले ...

Avoid walking in forested areas | जंगलव्याप्त परिसरात फिरणे टाळा

जंगलव्याप्त परिसरात फिरणे टाळा

Next

कोरोनाच्या संकटात डासांचा डंख

चंद्रपूर : मागील काही दिवसांपासून शहरात मोठ्या प्रमाणात डासांचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. सध्या नागरिक कोरोनाच्या संकटाला तोंड देत आहे. त्यामुळे प्रत्येकजण आपल्या प्रकृतीची काळजी घेत आहे.

राजुरातील अंतर्गत रस्त्याचे अतिक्रमण हटणार

राजुरा : शहरात मोठ्या प्रमाणात भंगार विक्रेते आहेत. त्यांनी रस्त्यावर अतिक्रमण करून साहित्य ठेवले आहे. त्यामुळे रहदारीस मोठी अडचण जात होती. हे अतिक्रमण हटविण्यात यावे, अशी मागणी यापूर्वी निवेदनातून करण्यात आली होती. मात्र, अद्यापही कुठलीही कार्यवाही करण्यात आली नाही.

बसस्थानकाच्या कामाला गती द्यावी

मूल : येथे सर्व सोईनीयुक्त अद्यावत बसस्थानकाच्या बांधकाम सुरू करण्यात आले. मात्र आता ते काम बंद आहे. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. बल्लारपूरच्या शहरातील बसस्थानकासारखे अद्यावत बसस्थानकाचा आराखडा मूल शहरासाठी तयार करण्यात आला. त्याचे बांधकामही सुरु झाले होते.

लालपरीच्या प्रवासी संख्येत होतेय वाढ

चंद्रपूर : सर्वसामान्यांची जीवन वाहिनी असलेल्या ‘लालपरी’ची थांबलेली चाके आता धावू लागली आहे. आतापर्यंत ५० टक्के क्षमतेने धावणाऱ्या बसमधून आता पूर्ण क्षमतेने प्रवासी वाहतुकीस परवानगी मिळाली आहे. त्यामुळे लालपरीची प्रवासी संख्या वाढत असल्याचे दिसून येत आहे. लॉकडाऊननंतर २० ऑगस्टपासून एसटी सेवा सुरू करण्यात आली आहे.

बेरोजगार संस्थांना काम देण्याची मागणी

चंद्रपूर : बेरोजगारांच्या हाताला काम मिळावे यासाठी जिल्ह्यात मोठ्या संख्येने बेरोजगार संस्थाची निर्मिती करण्यात आली आहे. मात्र, या संस्थांना कामच मिळत नसल्याने त्या अवसानात पडल्या असून बेरोजगार कामाची मागणी करीत आहे. विशेष म्हणजे, शासनाने या संस्थांना काम देण्याचे आश्वासन दिले. मात्र, या संस्थांना अद्यापही पाहिजे तसे शासकीय कामच मिळत नसल्याची स्थिती आहे. त्यामुळे संस्थाचालक अडचणीत आहेत.

मैदानी खेळाबाबत जनजागृती गरजेची

चंद्रपूर : काही वर्षांपूर्वी ग्रामीण भागात मैदानी खेळ मोठ्या प्रमाणात खेळले जायचे. त्यामुळे त्यांचे आरोग्य सुदृढ असायचे. मात्र, सध्या मुले मैदानी खेळ खेळताना दिसत नाही. मोबाईल गेमने हा ट्रेंडच बदलवून टाकला आहे. आता मुले मोबाईलवरच विविध खेळ खेळताना दिसत आहे. त्यामुळे त्यांच्या शरीरावर विपरित परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे मैदानी खेळाबाबत जनजागृती करण्याची मागणी होत आहे.

इंदिरानगर परिसरात सुविधांचा अभाव

चंद्रपूर : बंगाली कॅम्प परिसरातील इंदिरानगर परिसरात मूलभूत सुविधांचा अभाव आहे. रस्ते व नाल्यांचे बांधकाम अर्धवट आहेत. नाले न झाल्याने सांडपाणी तुुंबून राहते. रस्त्यावरील सांडपाण्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. मनपाने या परिसरात सुविधा पुरविण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

बाबूपेठ परिसरात कचऱ्याचे ढिगारे

चंद्रपूर : स्थानिक बाबूपेठ व नगिनाबाग परिसरात अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढिगारे तयार झाले आहेत. काही ठिकाणी कचराकुंड्या नसल्याने तसेच घंटागाडी येत नसल्याने बरेच जण मोकळ्या जागेवर कचरा टाकतात. हा कचरा उचलण्यात आला नाही. मनपा प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.

मुख्य चौकात मोकाट जनावरांचा ठिय्या

टेमुर्डा : येथील चौपदरी महामार्गावर मोकाट जनावरांचा वावर वाढला आहे. त्यामुळे रहदारीची समस्या निर्माण होत आहे. जनावरांमुळे अनेक दुचाकी वाहनांचे अपघात झाले आहे. त्यामुळे मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

प्लास्टिक पिशव्यांचा वापर सुरूच

गोंडपिपरी : शहरात दिवसेंदिवस प्लास्टिक पिशव्यांचा वापर वाढत आहे. बाजार परिसर व अन्य ठिकाणी गरज नसतानाही प्लास्टिक पिशव्या दिल्या जातात. या पिशव्या कुठेही टाकल्या जात असल्याने पर्यावरणाला धोका आहे. स्थानिक नगरपंचायतीने याकडे लक्ष देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

रस्त्यावरील वाहनांमुळे नागरिकांना अडचण

मूल : शहरातील गांधी चौक व अन्य वाॅर्डांतील चौकात वाहने ठेवण्याचे प्रकार वाढीस लागले. त्यामुळे नागरिक व वाहनधारकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.प्रत्येक वाॅर्डात स्वच्छता कर्मचारी दैनंदिन स्वच्छता करीत आहेत. मात्र, अनेक ठिकाणी घाणीचे साम्राज्य दिसून येत आहेत.

हायस्कूलसमोर गतिरोधक तयार करा

चंद्रपूर : येथील कस्तुरबा मार्गावरील ज्युबिली हायस्कूलजवळ गतिरोधक नसल्याने अपघात होत आहेत. या रस्त्यावर एकही गतिरोधक नाही. त्यामुळे अनेक अपघात झाले आहेत बांधकाम विभागाने या रस्त्यावर गतिरोधक तयार करावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

शहरातील वर्दळीच्या मार्गावर कचरा

चंद्रपूर : जिल्हा सामान्य रुग्णालयासमोरील वर्दळीच्या फुटपाथवर घाणीचे साम्राज्य पसरले आहे. दुर्गंधीमुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत नागरिकांनी वारंवार वरिष्ठांचे लक्ष वेधले. मनपाचेही लक्ष वेधले. मात्र कुणीही लक्ष दिले नाही.

तुकूम परिसरातील नाल्यांचा उपसा करावा

चंद्रपूर : तुकूम परिसरातील विविध वाॅर्डात घाणीचे साम्राज्य पसरल्याने नागरिक हैराण झाले आहेत. वॉर्डातील नाल्यांचा उपसा होत नाही. त्यामुळे तुडुंब भरल्या आहेत. घाणीमुळे रोगराई पसरू शकते. डासांचे प्रमाण वाढून आजार होऊ शकतात.

Web Title: Avoid walking in forested areas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.