विद्याधर बन्सोड यांच्या 'कोरकोंडा' कादंबरीला पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2021 04:34 AM2021-09-09T04:34:03+5:302021-09-09T04:34:03+5:30
चंद्रपूर : सरदार पटेल महाविद्यालयातील मराठी विभागप्रमुख प्रा. डॉ. विद्याधर बन्सोड यांच्या 'कोरकोंडा' कादंबरीला कादवा प्रतिष्ठान, नाशिकचा स्व. विनोदी ...
चंद्रपूर : सरदार पटेल महाविद्यालयातील मराठी विभागप्रमुख प्रा. डॉ. विद्याधर बन्सोड यांच्या 'कोरकोंडा' कादंबरीला कादवा प्रतिष्ठान, नाशिकचा स्व. विनोदी साहित्यसम्राट चंद्रकांत महामिने उत्कृष्ट वाङ्मय निर्मिती पुरस्कार (कादंबरी) २०२० जाहीर झाला. पुरस्काराचे स्वरूप ३१०० रुपये ,स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र असे आहे. हा पुरस्कार ऑक्टोबर २०२१ला नाशिक येथे सन्मानपूर्वक देण्यात येईल, असे प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजयकुमार मिठे व सरचिटणीस विठ्ठलतात्या संधान यांनी जाहीर केले. झाडीपट्टीतील बोलीभाषेचा समर्थ वापर करत, न्यायासाठी लढणाऱ्या पात्रांच्या माध्यमातून एका सामाजिक लढ्याचे चित्र कोरकोंडात रेखाटले आहे. आंबेडकरी चळवळीतून जागृत झालेले स्वभाव, अस्तित्व व अस्मितेच्या प्रस्थापनेसाठीचा आशावाद घेऊन झुंजणारी माणसे या कादंबरीत दिसून येतात. समकालीन ग्रामीण तरूणांच्या तसेच आदिवासींच्या प्रश्नांना भिडणारी ही कादंबरी आहे.