भारत, सर्वोदय व ज्ञानेश विद्यालयाच्या विद्यार्थ्यांना पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 04:51 AM2021-02-06T04:51:44+5:302021-02-06T04:51:44+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सिंदेवाही : बामसेफ, युवा सामाजिक ब्रिगेड व बहुजन विद्यार्थी संघटना, तालुका सिंदेवाही यांच्यातर्फे सिंदेवाही तालुक्यातील शालेय ...
लोकमत न्यूज नेटवर्क
सिंदेवाही : बामसेफ, युवा सामाजिक ब्रिगेड व बहुजन विद्यार्थी संघटना, तालुका सिंदेवाही यांच्यातर्फे सिंदेवाही तालुक्यातील शालेय व महाविद्यालय विद्यार्थ्यांसाठी आयोजित तालुकास्तरीय संत गाडगेबाबा जीवन परीक्षा आणि देशभक्तीपर गीतगायन स्पर्धेतील प्रथम, द्वितीय व तृतीय विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बामसेफचे प्रा. भारत मेश्राम होते तर प्रमुख पाहुणे म्हणून बहुजन विद्यार्थी संघटनेचे सचिन शेंडे, युवा सामाजिक ब्रिगेडचे अमोल निनावे, युवा गायक युवीन कापसे व भारत विद्यालयाचे मुख्याध्यापक वाटगुरे उपस्थित होते. यावेळी प्रमुख पाहुण्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
दरम्यान, तालुकास्तरीय संत गाडगेबाबा जीवन परीक्षेत प्रथम, द्वितीय व तृतीय पुरस्कार अनुक्रमे जान्हवी पोपटे (सर्वोदय कन्या विद्यालय, सिंदेवाही), अमान शेख (भारत विद्यालय, नवरगाव) व योगिता सोनवणे (ज्ञानेश ज्युनिअर काॅलेज, नवरगाव) यांनी मिळवला. तालुकास्तरीय देशभक्तीपर गीतगायन स्पर्धेत प्रशांत बण्डिवार (वासेरा) ,शीतल पुस्तोडे (सर्वोदय ज्युनिअर काॅलेज, सिंदेवाही) व अनुष्का पोशत्तीवार (भारत विद्यालय, नवरगाव) यांना अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय पुरस्कार मिळवला. प्रास्ताविक शिक्षणतज्ज्ञ प्रा. भारत मेश्राम यांनी केले. सूत्रसंचालन संघर्ष चहान्दे यांनी केले तर प्रणील पोपटे यांनी आभार मानले. ________________________________________