दुचाकी रॅलीतून माळढोक संवर्धनाबाबत जनजागृती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2021 04:33 AM2021-02-17T04:33:30+5:302021-02-17T04:33:30+5:30
वरोरा : जगात अत्यंत दुर्मीळ समजला जाणाऱ्या माळढोक पक्ष्याचे मागील सोळा वर्षांपासून वरोरा परिसरात वास्तव्य आहे. माळढोक पक्षी वाढले ...
वरोरा : जगात अत्यंत दुर्मीळ समजला जाणाऱ्या माळढोक पक्ष्याचे मागील सोळा वर्षांपासून वरोरा परिसरात वास्तव्य आहे. माळढोक पक्षी वाढले पाहिजेत, त्याचे संवर्धन झाले पाहिजे, याबाबत जनजागृती करण्याकरिता दुचाकी रॅलीचे आयोजन करण्यात आले.
दुचाकी वाहन रॅलीस विभागीय वन अधिकारी सारिका जगताप यांनी हिरवी झेंडी दाखविली. यावेळी तहसीलदार रमेश कोळपे, पोलीस निरीक्षक दीपक खोबरागडे, बाजार समिती सभापती राजेंद्र चिकटे, नगरसेवक छोटू शेख, रोटरी अध्यक्ष डॉक्टर मनोज जोगी, बाजार समिती संचालक संजय घागी, गुरुदेव सेवा मंडळाचे लक्ष्मण गमे, प्राध्यापक रूपलाल कावळे उपस्थित होते. रॅली वरोरा शहरातून कळमगव्हाण तुळाना आष्टी, मार्डा, एकोना, पांझु्र्नी, चरुर, वनोजा गावातून काढण्यात आली. प्रत्येक गावात रॅलीचे स्वागत करण्यात आले. रॅलीचा समारोप गणेश मंदिर वनोजा वरोरा येथे वनपरिक्षेत्र अधिकारी मधुकर राठोड यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आला. यावेळी तहसीलदार रमेश कोळपे, सेवानिवृत्त राउंड ऑफिसर बी.टी. लालसरे, नगरसेवक छोटू शेख, लक्ष्मण गमे, प्राध्यापक रूपलाल कावळे, प्रवीण खिरटकर उपस्थित होते. यावेळी बाळू जीवने, विशाल मोरे, हितेश राजनहिरे, प्रवीण खिरटकर, वसंत बर्डे, विपिन फुलझेले आदींचा सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक ग्राउंड ऑफिसर निबुदे यांनी केले.