वीज वितरण कंपनीकडून वीज वापराविषयी जागृती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2018 11:12 PM2018-01-13T23:12:04+5:302018-01-13T23:12:24+5:30
वीज वितरण कंपनीच्या वतीने सुरक्षा सप्ताहानिमित्त शहरात भव्य जागृती रॅली काढण्यात आली. रॅलीत सर्व अभियंता व कर्मचाऱ्यांचा सहभाग होता.
आॅनलाईन लोकमत
वरोरा : वीज वितरण कंपनीच्या वतीने सुरक्षा सप्ताहानिमित्त शहरात भव्य जागृती रॅली काढण्यात आली. रॅलीत सर्व अभियंता व कर्मचाऱ्यांचा सहभाग होता.
वीज वितरण कंपनीने सुरक्षा सप्ताह सुरू केला. त्यानिमित्त विविध कार्यक्रम सुरू आहेत. विजेचा योग्य वापर करावा आणि अपघातांपासून सावध राहावे, यासाठी शहरात रॅली काढण्यात आली. जीवंत विद्युत तारेवर अडकलेली पतंग काढताना होणारा अपघात, शेतात विद्युत तारा पसरविणे आदी घटनांमुळे नागरिक व प्राणी, जनावरांचा बळी जातो. त्यामुळे असे प्रकार टाळावेत, हा संदेश रॅलीतून देण्यात आला. वीज चालू असताना त्यापासून धोके टाळण्याकरिता कोणकोणते उपाय योजना केले जातात. शिवाय विद्युत शॉक लागलेल्या व्यक्तीवर प्रथमोपचार कसा करावा, याचीही माहिती देण्यात आली जी.एम.आर. कंपनीच्या अग्निशामक दलाने प्रात्यक्षिक करून दाखविले. रॅलीचा समारोप प्रसंगी विद्युत निरीक्षक प्रदीप चामट यांनी मार्गदर्शन करण्यात आला. शहरातून रॅली मार्गक्रमण करीत जुना वणी नाका येथील कटारिया मंगल कार्यालयात समारोप करण्यात आला. कार्यकारी अभियंता प्रशांत राठी, वरोरा येथील उपकार्यकारी अभियंता विनोदकुमार भोयर, उपकार्यकारी अभियंता, सचिन बदखल, जीएमआरचे मुकुंद बोगावार, अजित अंचलवालकर, वनविभागाचे आर. जी. वांदिले, वीज वितरण कंपनीचे कंत्राटदार अनिल भट, दामोधर भाजपायले, राजेश काळे, किशोर उत्तरवार, वीज वितरण कंपनीचे कनिष्ठ अभियंता, सहायक अभियंता, तंत्रज्ञ व कर्मचारी बहुसंख्येने सहभागी झाले होते.