शिक्षणाच्या बजबजपुरीविरुद्ध एकवटले जागृत पालक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2018 11:24 PM2018-01-31T23:24:56+5:302018-01-31T23:25:44+5:30

शिक्षण संस्थाचालकांची मनमानी आणि एकूणच शिक्षण व्यवस्थेतील बजबजपुरीविरुद्ध एकटा पालक आवाज उठवविण्याचे धाडस कदापि करू शकत नाही.

Awareness guarded parents about the challenges of education | शिक्षणाच्या बजबजपुरीविरुद्ध एकवटले जागृत पालक

शिक्षणाच्या बजबजपुरीविरुद्ध एकवटले जागृत पालक

Next
ठळक मुद्देचंद्रपुरात ‘पेस’ चळवळीची मुहूर्तमेढ : विद्यार्थी, पालकाभिमुख लढ्यासाठी कृतीकार्यक्रम

आॅनलाईन लोकमत
चंद्रपूर: शिक्षण संस्थाचालकांची मनमानी आणि एकूणच शिक्षण व्यवस्थेतील बजबजपुरीविरुद्ध एकटा पालक आवाज उठवविण्याचे धाडस कदापि करू शकत नाही. त्यामुळे शासकीय व खासगी कंपनीत कार्यरत काही उच्चपदस्थ अधिकारी-कर्मचारी, व व्यवसाय क्षेत्रातील पालकांनी पठडीबद्ध जीवनाची चौकट नाकारून उपेक्षित विद्यार्थी-पाल्यांच्या हितासाठी स्वच्छ मनाने संघटीत झाले. त्यातून पेस नावाची चळवळ चंद्रपूर शहरात प्रथमच आकाराला आली आहे.
शिक्षणाचे खासगीकरण झाल्याने सर्वाधिक फटका शालेयपूर्व शिक्षणाला बसला. सर्वसामान्य पालकांना आर्थिक खर्च उचलणे अशक्य झाले. पोटाला चिमटा देऊन मुलांना कॉन्व्हेंटमधील इंग्रजी माध्यमाचे शिक्षण देताना पालकांची मोठी दमछाक होत आहे. विशेष म्हणजे, धर्मादाय आयुक्तांच्या कार्यालयात पंजीबद्ध झालेली अशा प्रकारची ही पहिलीच संघटना असल्याचा दावा केला जात आहे.
खासगीकरणाचे धोरण लागू करून शासनाने शालेयपूर्वक शिक्षणाची जबाबदारी झटकली. खासगी संस्थांना आर्थिक लाभाचे कुरण उपलब्ध करुन दिले. परिणामी, जिल्हा व तालुक्यापासून तर मोठ्या गावांमध्ये कॉन्व्हेंट शिक्षणाच्या नावाखाली जणू दुकाने सुरु झाल्याचे चित्र दिसून येत आहे. या खासगी संस्थांच्या मनमानीला चाप बसावा, यासाठी शिक्षण विभागाने अनेक निर्देश दिलेत. कागदावर कठोर नियमावलीही तयार केली. मात्र, शासनाकडून अनुदानच घेत नाही. त्यामुळे नियम लागू नसल्याचे कारण पुढे करून संस्थाचालक पालकांची बोळवण करतात. या मानसिकतेमुळे खासगी इंग्रजी शाळांमध्ये पालकांच्या अडचणी बेदखल होत आहेत. एखाद्या पालकांने धाडस करून संस्थाचालक अथवा प्राचार्यांपुढे तक्रार मांडल्यास हुसकावले जाते. शिवाय, पालकांचा राग पाल्यांवर काढण्याचे प्रकार जिल्ह्यात वाढीस लागले आहेत. चंद्रपूर शहरातील खासगी कॉन्व्हेंट शिक्षण संस्थांच्या मनमानीविरुद्ध आवाज उठवल्याने पोलिसांमध्ये तक्रार करण्यापर्यंत काही संस्थांची मजल गेली होती. अशा भ्रष्ट व्यवस्थेत मुलांचे भविष्य करपू नये, हा दृष्टिकोन पुढे ठेवून एकट्याने लढणे कठीण आहे. याची जाणिव जागृत पालकांना झाली. त्यामुळे जात, धर्म, पंथ, भाषा आणि कुणाची राजकीय बांधिलकी न स्वीकारता केवळ सर्वसामान्य होतकरु उपेक्षित पालक आणि विद्यार्थ्यांसाठी पॅरेंट्स असोसिएशन आॅफ चिल्ड्रन एज्युकेशन (पेस) चळवळीची शहरात पहिल्यांदाच मुहर्तमेढ रावण्यात आली. विद्यार्थी व पालकांच्या शैक्षणिक, आर्थिक हिताचा कृतीकार्यक्रमही जाहीर करण्यात आला आहे.

विद्येविना मती जाऊ नये यासाठी...
विद्यार्थ्यांच्या आर्थिक शैक्षणिक हिताचे संवर्धन, शाळा व्यवस्थापन व पालकांमध्ये समन्वय साधने. शिक्षणाचा दर्जा उचंवण्यास उपक्रम राबविणे, शैक्षणिक जागृती करण्यासाठी नामवंत अभ्यासकांचे मार्गदर्शन शिबिर, शासकीय नियमाचे पालन करण्यास शाळा व्यवस्थापनावर लोकशाही मार्गावर सूचना देणे, स्पर्धा परीक्षेसाठी मार्गदर्शन आणि संशोधन प्रकल्पाला चालना देणे, शिक्षणाच्या पायाभूत मूल्यांची जाणीव करुन देण्यासाठी ‘पेस’ ही चळवळ कार्य करणार आहे.

Web Title: Awareness guarded parents about the challenges of education

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.