तरंग सुपोषित मधून होणार पोषण आहाराची जनजागृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2020 04:25 AM2020-12-24T04:25:34+5:302020-12-24T04:25:34+5:30

चिमूर : स्तनदा माता, बालके यांना पोषण आहाराबाबत माहिती व मार्गदर्शन करण्यासाठी ‘तरंग सुपोषित महाराष्ट्राचा’ हा डिजिटल प्लॅटफॉर्म महिला ...

Awareness of nutritious food will come from Tarang Supushit | तरंग सुपोषित मधून होणार पोषण आहाराची जनजागृती

तरंग सुपोषित मधून होणार पोषण आहाराची जनजागृती

googlenewsNext

चिमूर : स्तनदा माता, बालके यांना पोषण आहाराबाबत माहिती व मार्गदर्शन करण्यासाठी ‘तरंग सुपोषित महाराष्ट्राचा’ हा डिजिटल प्लॅटफॉर्म महिला व बालविकास विभागातर्फे सुरु करण्यात आला आहे. सर्वदूर लोकशिक्षण आणि योजनेची प्रभावी अंमलबजावणी यासाठी हा प्लॅटफॉर्म उपयुक्त ठरणार आहे.

कोरोना साथीच्या काळात स्तनदा माता, लहान बालके अशा ७४ लाख लाभार्थ्यांना पोषण आहार पोहोचवण्यात आला. या साथीच्या काळात अनेक अडचणी ठिकठिकाणी उभ्या राहिल्या होत्या. मात्र, विभागाच्या सातत्यपूर्ण प्रामाणिक प्रयत्नांमुळेच राष्ट्रीय पोषण माह २०२० मध्ये राज्याचा देशात पहिला क्रमांक आला आहे. आता ‘सक्षम महिला, सुदृढ बालक, सुपोषित महाराष्ट्र’ हे ध्येय साध्य करण्यासाठी ‘तरंग सुपोषित महाराष्ट्राचा’ हा डिजिटल प्लॅटफॉर्म सुरू करण्यात आला असून त्याद्वारे पोषणविषयक माहिती चित्रफितींच्या माध्यमातून घरोघरी पोहोचविले जाणार आहे. तरंग सुपोषित महाराष्ट्राचा हा आय. व्ही. आर (इंटरॲक्टिव्ह वॅाइस रिस्पॅान्स) प्रणालीवर आधारित डिजिटल सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे. या माध्यमातून घराघरात जाऊन स्तनदा माता, बालकांचे पालक यांच्याशी संवाद साधून सुपोषणाबाबत माहिती, मार्गदर्शन केले जाणार आहे. पोषणविषयक जनजागृतीसाठी हा प्लॅटफॉर्म उपयुक्त ठरणार आहे.

बॉक्स

या उपक्रमात हेल्पलाइन, ब्रॉडकास्ट कॅाल, व्हॉट्सॲप चॅटबोटचा समावेश आहे. हेल्पलाईन क्रमांकावरून गरोदर महिला, स्तनदा मातांना व्हिडिओ, ऑडियो, व्हॅाट्सअप माध्यमातून पोषण, बालकांची घ्यावयाची काळजी याची माहिती दिली जाणार आहे. ‘एक घास मायेचा’ ही खास पाककृतींची व्हिडीओ मालिका तयार करण्यात आली असून त्याद्वारे खास माता आणि बालकांसाठी विविध पाककृतींचे प्रात्यक्षिक दाखविण्यात येणार आहे. आजीबाईच्या गुजगोष्टी या ॲनिमेटेड मालिकेतून लोकांच्या मानसिक परिवर्तनाबाबत रंजक गोष्टींच्या माध्यमातून संदेश दिले जाणार आहेत. तसेच पोषणासाठी वडिलांची भूमिका ही मोहीमदेखील व्हिडिओच्या माध्यमातून राबवण्यात येत आहे.

कोटतरंग सुपोषित महाराष्ट्र या उपक्रमातून गरोदर माता, स्तनदा माता, ० ते ६ वयोगटातील बालके यांच्या पोषण आहाराविषयीची माहिती आता मातांना मोबाईल हेल्पलाईनवरून घरीच मिळण्यास मदत होणार आहे.

पूनम गेडाम

प्रकल्प अधिकारी, एकात्मिक बाल विकास प्रकल्प, चिमूर

Web Title: Awareness of nutritious food will come from Tarang Supushit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.