रोटरी व इनरव्हील क्लबतर्फे रस्ता सुरक्षेबाबत जनजागृती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2021 04:33 AM2021-02-17T04:33:46+5:302021-02-17T04:33:46+5:30
चंद्रपूर : रोटरी क्लब ऑफ स्मार्ट सिटी व इनरव्हील क्लब ऑफ चंद्रपूरच्या वतीने रस्ते सुरक्षा अभियानांतर्गत जनजागृती करण्यात आली ...
चंद्रपूर : रोटरी क्लब ऑफ स्मार्ट सिटी व इनरव्हील क्लब ऑफ चंद्रपूरच्या वतीने रस्ते सुरक्षा अभियानांतर्गत जनजागृती करण्यात आली आहे. या अनुषंगाने वाहतूक नियमासंदर्भात जनजागृतीसाठी बुकलेट तयार करण्यात आले आहे. या बुकलेटचे पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांच्या हस्ते विमोचन करण्यात आले.
दिवसेंदिवस अपघाताच्या संख्येत वाढ होत आहे. वाहतूक नियमांचे पालन व्हावे, याबाबत जनजागृती व्हावी, या दृष्टिकोनातून हा उपक्रम राबविण्यात आला. सीटबेल्टचे फायदे, हेल्मेट घालण्याची गरज, सिग्नलचे महत्त्व, अपघाताची कारणे याबाबत जनजागृतीपर संदेश या बुकलेटमध्ये प्रसिद्ध करण्यात आला आहे. त्यामुळे हे पत्रक सर्व वाहनचालकांना फायदेशीर आहे. या बुकलेटचे इनरव्हील क्लबच्या वतीने एफईएस गर्ल्स स्कूल, विद्यानिकेतन स्कूल यासह अन्य पाच शाळेत या पत्रकाचे वितरण करण्यात आले. या उपक्रमाचे पोलीस अधीक्षक अरविंद साळवे, वाहतूक निरीक्षक यादव यांनी कौतुक केले. यावेळी रोटरी क्लबच्या माजी अध्यक्ष डॉ. विद्या बांगडे, डिस्ट्रिक्ट ॲडिटर रमा गर्ग, सचिव पूनम कपूर, शकुंतला गोयल, इनरव्हील क्लबच्या अध्यक्ष कल्पना गुप्ता, दुर्गा पोटुदे, अशोक गोयल आदी उपस्थित होते.