कोविड प्रतिबंध व कोविड पश्चात गुंतागुंत टाळण्यास आयुर्वेद उपयोगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 04:28 AM2021-05-21T04:28:58+5:302021-05-21T04:28:58+5:30

चंद्रपूर : सध्या कोरोनाचा कहर सुरू आहे. अनेकांना कोरोनाचा संसर्ग झाला असून नागरिकांना आयुर्वेद या प्राचीन उपचार पद्धतीचा ...

Ayurveda is useful for prevention of covid and to prevent complications after covid | कोविड प्रतिबंध व कोविड पश्चात गुंतागुंत टाळण्यास आयुर्वेद उपयोगी

कोविड प्रतिबंध व कोविड पश्चात गुंतागुंत टाळण्यास आयुर्वेद उपयोगी

Next

चंद्रपूर : सध्या कोरोनाचा कहर सुरू आहे. अनेकांना कोरोनाचा संसर्ग झाला असून नागरिकांना आयुर्वेद या प्राचीन उपचार पद्धतीचा अवलंब व्हावा यासाठी आपली प्राचीन चिकित्सापध्दती असलेल्या आयुर्वेदाचा कसा उपयोग होऊ शकतो. याच्या माहितीसाठी मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले यांच्या पुढाकाराने कोविड आणि आयुर्वेद, गरोदरपणात स्त्रियांनी घ्यावयाची काळजी या विषयांवर ऑनलाइन कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.

या ऑनलाइन कार्यशाळेत महाराष्ट्र आरोग्य मंडळ, पुणेचे संशोधन समन्वयक डाॅ. प्रणिता जोशी व डाॅ. सुशील देशमुख यांनी मार्गदर्शन केले. या कार्यशाळेच्या माध्यमातून त्यांनी आयुर्वेद या शाश्वत शास्रानुसार दिनचर्या व ऋतुचर्येच्या आचरणाव्दारा कोविडसारख्या आजारांवर कशी मात करता येईल, यावर मार्गदर्शन केले. तसेच कोविडमुळे होणारे गंभीर आजार किंवा मृत्यू टाळण्याकरिता मानसिक शक्ती व इच्छाशक्ती वाढविणे कसे शक्य आहे, ते सांगितले.

या प्रशिक्षणास जिल्ह्यातील सर्व वैद्यकीय अधिकारी, समुदाय आरोग्य अधिकारी, आरोग्य सेविका, आशा स्वयंसेविका उपस्थित होते. जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ.राजकुमार गहलोत यांनी प्रास्ताविक केले. यावेळी जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक शीतल राजापुरे-देशमुख, वैद्यकीय अधिकारी डाॅ. प्रीती राजगोपाल, प्र.जिल्हा आयुष अधिकारी डाॅ. मीना मडावी तसेच से.नि.जिल्हा आयुष अधिकारी डाॅ.गजानन राऊत उपस्थित होते.

Web Title: Ayurveda is useful for prevention of covid and to prevent complications after covid

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.