विधी सेवा प्राधिकरणाच्या प्रांगणात आयुष उद्यान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2021 04:29 AM2021-03-10T04:29:22+5:302021-03-10T04:29:22+5:30
चंद्रपूर : जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती मनिष पितळे यांच्या मार्गदर्शनातून प्राधिकरणाच्या प्रांगणात आयुष उद्यान उभारण्यात ...
चंद्रपूर : जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती मनिष पितळे यांच्या मार्गदर्शनातून प्राधिकरणाच्या प्रांगणात आयुष उद्यान उभारण्यात आले आहे. या उद्यानामध्ये गुळवेल, लक्ष्मीतरु, वेखंड, कोरफड, शतावरी, अश्वगंधा, वाळा, गवती चहा, मंदुकपर्णी, भूनिंब,काळी मिरी आदी ४० हून अधिक आयुवैर्दिक वनस्पतीची लागवड करण्यात आली आहे. या आयुष उद्यानाचे उद्घाटन पाहुण्यांच्या उपस्थितीत नुकतेच पार पडले.
मनोधैर्य योजनेतील पीडिता, मोफत विधीसेवेचे लाभार्थी, विधी सेवा स्वयंसेवक, न्यायिक अधिकारी, विधिज्ञ, कर्मचारी तसेच सर्वसामान्य जनतेसाठी आयुवैर्दिक वनस्पतीचे आयुष उद्यान लाभदायी ठरणार आहे. आयुष उद्यानाच्या माध्यमातून जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाकडून मोफत न्यायसेवेसोबत सर्वांसाठी आरोग्यसेवा साध्य होईल, असा विश्वास प्रमुख जिल्हा व सत्र न्यायधिश कविता अग्रवाल म्हणाल्या, व्यक्त केला. ही भारतातील पहिला उद्यानमाला असून त्यांचे सर्वधन करण्याचा निर्धारही त्यांनी यावेळी घेतला. आयुवैदतज्ज्ञ डॉ. धानोरकर म्हणाले, निसर्गातील प्रत्येक वनस्पतीमध्ये काही ना काही औषधी गुणर्धम आहेत. आयुष उद्यानात लावलेल्या वनस्पती दैनंदिन जीवनातमध्ये उपयुक्त असल्याचे त्यांनी सांगितले. प्रास्ताविक व आभार प्राधिकरणाचे सचिव किरण जाधव यांनी मानले. यावेळी महिला न्यायधिश व महिला पॅनलचे अधिवक्ता यांच्या हस्ते वनस्पतीची लागवड करण्यात आली. यावेळी न्यायधिश विरेंद्र केदार, एस. जे. अन्सारी, प्रभाकर मोडक, अनुराग दीक्षित, के. पी.लोखंडे, श्रीधर मौदेकर आदी उपस्थित होते.