बी. एड. अंतिम वर्षाचा निकाल लवकर जाहीर करावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2021 04:33 AM2021-08-17T04:33:09+5:302021-08-17T04:33:09+5:30

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे विद्यापीठांच्या परीक्षा वेळेवर होऊ न शकल्यामुळे निकाल वेळेवर लागला नाही. त्यामुळे बी. एड. व एम. एड. प्रशिक्षणार्थींची ...

B. Ed. Final year results should be announced soon | बी. एड. अंतिम वर्षाचा निकाल लवकर जाहीर करावा

बी. एड. अंतिम वर्षाचा निकाल लवकर जाहीर करावा

Next

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे विद्यापीठांच्या परीक्षा वेळेवर होऊ न शकल्यामुळे निकाल वेळेवर लागला नाही. त्यामुळे बी. एड. व एम. एड. प्रशिक्षणार्थींची पदवी पूर्ण झाली नाही. महाराष्ट्र सरकारने लगेच शिक्षक पात्रता चाचणी अर्थात टीईटीची परीक्षा घेण्याचे जाहीर केले. यामुळे अनेक बी.एड व एम.एड. प्रशिक्षणार्थी परीक्षेपासून वंचित राहणार, हा त्यांच्यावर अन्याय आहे. सध्या गोंडवाना विद्यापीठ गडचिरोलीच्या बी.एड., एम. एड. अंतिम वर्षाची शेवटच्या सत्राची परीक्षा सुरू आहे. त्याचा निकाल परीक्षा झाल्यानंतर लगेच जाहीर करावा. जेनेकरून प्रशिक्षणार्थी टीईटी परीक्षेपासून वंचित राहणार नाही. करिता विद्यापीठाने युद्धपातळीवर निकाल जाहीर करण्याची कार्यवाही करावी, अशी मागणी विद्यापीठाच्या कुलगुरुंकडे निवेदनामार्फत सिनेट सदस्य प्रशांत दोंतुवार यांनी केली आहे.

२५ ऑगस्ट टीईटी पात्रता परीक्षा फॉर्म भरण्याची अंतिम तारीख

टीईटी परीक्षेचे फॉर्म भरण्याची अंतिम तारीख २५ ऑगस्ट २०२१ आहे व बी.एड. द्वितीय वर्ष सेमिस्टर ४ प्रशिक्षणार्थींची परीक्षा १० ऑगस्ट ते १७ ऑगस्ट २०२१ पर्यंत आणि एम. एड. द्वितीय वर्ष सेमिस्टर ४ प्रशिक्षणार्थींची परीक्षा १० ऑगस्ट ते १२ ऑगस्ट २०२१ आहे. २५ तारखेच्या आत निकाल लागला तर अनेक बी.एड. व एम. एड. प्रशिक्षणार्थींना ती परीक्षा देता येणार. यामुळे कुणाचेही नुकसान होणार नाही. विद्यापीठाने याचा गंभीर विचार करून बी. एड. व एम. एड. परीक्षेचा निकाल लवकरात लवकर जाहीर करावा, अशी मागणी आहे.

160821\img_20210814_091305.jpg

बी. एड.अंतिम वर्षाचा निकाल लवकर जाहीर करावा

Web Title: B. Ed. Final year results should be announced soon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.