बाप रे बाप ! ग्रामीण रुग्णालयात निघाला विषारी घोणस साप!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2021 07:43 PM2021-06-05T19:43:50+5:302021-06-05T19:44:23+5:30
शुक्रवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास ग्रामीण रुग्णालय परिसरात साप फिरत असल्याचे काही जणांच्या निदर्शनास आले. त्यांनी त्वरित रुग्णालयातील परिचारिकांना ही माहिती दिली.
नागभीड (चंद्रपूर) : येथील ग्रामीण रुग्णालय परिसरात शुक्रवारी घोणस नावाचा अत्यंत विषारी साप दिसताच क्षणभर सर्वांची चांगलीच तारांबळ उडाली. मात्र प्रसंगावधान राखून उपस्थित परिचारिकेने सर्पमित्रांशी त्वरित संपर्क साधला आणि सर्पमित्रांनी या सापास ताब्यात घेतले.
शुक्रवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास ग्रामीण रुग्णालय परिसरात साप फिरत असल्याचे काही जणांच्या निदर्शनास आले. त्यांनी त्वरित रुग्णालयातील परिचारिकांना ही माहिती दिली. परिचारिकांनी लागलीच झेप निसर्ग संस्थेचे उपाध्यक्ष व सर्पमित्र अमोल वानखेडे आणि क्षितिज गरमडे यांच्याशी संपर्क साधला. वानखेडे आणि गरमडे त्वरित ग्रामीण रुग्णालयात पोहचले व जहाल विषारी अशा घोणस सापाला पकडून नैसर्गिक अधिवासात सोडून दिले.