बाबा आमटे अभ्यासिकेची इमारत सुस्थितीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2019 10:27 PM2019-07-04T22:27:38+5:302019-07-04T22:27:53+5:30

चंद्रपुरातील बाबा आमटे अभ्यासिकेचा दर्शनी भाग कोसळल्याची अफवा बातमीद्वारे काही पोर्टलच्या माध्यमातून पसरविण्यात येत आहे. मात्र ही अफवा खोटी असून पाणी लागल्यामुळे केवळ पिओपीची पट्टी पडल्याचे बांधकाम विभागाने स्पष्ट केले आहे.

Baba Amte Abhayasike building is in good condition | बाबा आमटे अभ्यासिकेची इमारत सुस्थितीत

बाबा आमटे अभ्यासिकेची इमारत सुस्थितीत

googlenewsNext
ठळक मुद्देकेवळ पीओपीची पट्टी पडली : बांधकाम विभागाची स्पष्टोक्ती

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : चंद्रपुरातील बाबा आमटे अभ्यासिकेचा दर्शनी भाग कोसळल्याची अफवा बातमीद्वारे काही पोर्टलच्या माध्यमातून पसरविण्यात येत आहे. मात्र ही अफवा खोटी असून पाणी लागल्यामुळे केवळ पिओपीची पट्टी पडल्याचे बांधकाम विभागाने स्पष्ट केले आहे.
या संदर्भात बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी सांगितले की, गुरुवारी सकाळी बाबा आमटे अभ्यासिकेच्या पोर्चमधील पीओपीच्या सिलींगची एक पट्टी पाण्याने ओली होऊन पडलेली आहे. पोर्चवरील स्लॅबवर पाईपमध्ये कचरा अडकल्याने (झाडांची पाने) पाणी तुंबुन गळल्यामुळे ओली होवून ही पट्टी पडली आहे. स्लॅबवरील कचरा काढून पाणी काढणे सुरू आहे. सिलींग कोरडे झाल्यावर निघालेच्या पट्टीच्या जागेवर नविन पट्टी बसविण्यात येईल. इतर संपूर्ण इमारतीची तपासणी करण्यात आली असून त्यात कुठेही गळती नाही. इमारत अत्यंत सुस्थितीत आहे. अशा पध्दतीच्या अफवांवर कोणीही विश्वास ठेवू नये, असेही कार्यकारी अभियंता यांनी म्हटले आहे. यासंदर्भात जिल्हा पोलीस अधिक्षकांनाही आपण अवगत करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

Web Title: Baba Amte Abhayasike building is in good condition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.