बाबा आमटे व साधनाताई आमटे पुरस्कार वितरण उद्या

By admin | Published: January 7, 2017 12:45 AM2017-01-07T00:45:00+5:302017-01-07T00:45:00+5:30

दरवर्षी दिला जाणारा बाबा आमटे मानवता पुरस्कार आसाममधील बोडोलँड येथील द अ‍ॅन्ट संस्थेचे संस्थापक डॉ. सुनील कौल ...

Baba Amte and Sadhnatai Amte award distribution tomorrow | बाबा आमटे व साधनाताई आमटे पुरस्कार वितरण उद्या

बाबा आमटे व साधनाताई आमटे पुरस्कार वितरण उद्या

Next

विजय भटकर यांची उपस्तिथी
वरोरा : दरवर्षी दिला जाणारा बाबा आमटे मानवता पुरस्कार आसाममधील बोडोलँड येथील द अ‍ॅन्ट संस्थेचे संस्थापक डॉ. सुनील कौल आणि स्व. साधनाताई आमटे समिधा पुरस्कार जेनिफर लियाँग यांना जाहीर झाला असून वरोरा येथे ८ जानेवारी रोजी परम महासंगणकाचे जनक डॉ. विजय भटकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे.
बाबा आमटे मानवता पुरस्कार व स्व. साधनाताई आमटे समीधा पुरस्कार गोवा स्वातंत्र्यसंग्राम सैनिक श्रीधरराव पद्मावार भद्रावती व गिरीश पद्मावार प्रायोजीत विद्यार्थी सहायक समिती, वरोराच्या वतीने देण्यात येतो. यापूर्वी हा पुरस्कार कोलकताचे मामून अख्तर, सातारा येथील अविनाश पोळ, महाराष्ट्र भूषण अभय बंग, पोपटराव पवार, सुनंदा पटवर्धन आदींना देण्यात आला आहे. आसाम राज्यातील द अ‍ॅन्ट या संस्थेचे संस्थापक डॉ. सुनील कौल व जनिफर लियॉग हे दहशतवाद प्राबल्य असलेल्या जंगलव्याप्त अतिदुर्गम भागात उच्च विद्याविभूषित असूनही मागील १६ वर्षांपासून काम करीत आहेत. त्यांना पुरस्कार ८ जानेवारीला दुपारी ३.३० वाजता ज्ञानदा जीवन विकास केंद्र परिसर, आनंदवन चौक, वरोरा प्रदान करण्यात येणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. हरीश वरभे राहतील. पुरस्कारामध्ये प्रत्येकी ५१ हजार रुपये रोख, मानपत्र व स्मृतिचिन्हाचा समावेश आहे. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन विद्यार्थी सहायक समिती वरोराचे संस्थापक सचिव व अध्यक्ष प्रा. मधुकर उपलेंचवार यांनी केले आहे. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Baba Amte and Sadhnatai Amte award distribution tomorrow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.