आनंदवनात कडधान्यातून साकारली बाबा-तार्इंची प्रतिमा
By admin | Published: January 10, 2015 10:53 PM2015-01-10T22:53:00+5:302015-01-10T22:53:00+5:30
कर्मयोगी बाबा आमटे यांचे शताब्दी वर्ष साजरे केले जात आहे. यामध्ये नवीन नवीन संकल्पना कृतीत उतविल्या जात असताना आनंदवनात कर्मयोगी बाबा आमटे व साधनातार्इंची प्रतिमा
वरोरा : कर्मयोगी बाबा आमटे यांचे शताब्दी वर्ष साजरे केले जात आहे. यामध्ये नवीन नवीन संकल्पना कृतीत उतविल्या जात असताना आनंदवनात कर्मयोगी बाबा आमटे व साधनातार्इंची प्रतिमा कडधान्याचा वापर करून रेखाटण्यात आली आहे. छायाचित्र काढण्यासाठी आठ तासाचा कालावधी लागला आहे.
आनंदवन मूकबधिर विद्यालयातील कला शिक्षक तथा महारांगोळीकार प्रल्हाद ठक यांनी कर्मयोगी बाबा आमटे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त मूकबधिर विद्यालयातील एका खोलीमध्ये प्रतिमा साकारण्यासाठी २० प्रकारच्या कडधान्यांचा वापर केला आहे.
ही प्रतिमा साकारण्यासाठी १५ ते १६ किलो कडधान्याचा वापर करण्यात आला आहे. यासाठी आठ तासांचा कालावधी लागला आहे.
११ फुट लांब व १२ फुट रुंद असलेले कर्मयोगी बाबा व साधनातार्इंचे कडधान्यानी रेखाटलेले चित्र आनंदवनात येणाऱ्या पर्यटकांचे लक्ष वेधून घेत आहे. यापूर्वी ठक यांनी चंद्रपूर येथील पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर महारांगोळी रेखाटून गिनिज बुकात नोंद केली होती. तसेच त्यांनी स्वत:च्या रक्ताने १२ महापुरुषांच्या प्रतिमाही साकारल्या होत्या, हे विशेष.
शेतकऱ्यांच्या धान्याचे प्रदर्शन व्हावे व शेतकऱ्यांच्या धान्याला योग्य दर मिळावा, ही कर्मयोगी बाबांची इच्छा होती. डॉ. विकास आमटे यांच्या प्रेरणेने कर्मयोगी बाबा आमटे व साधनाताईंचे कडधान्याने छायाचित्र रेखाटले असल्याचे ठक यांनी सांगितले. (तालुका प्रतिनिधी)