जिल्हाभरात बाबासाहेबांना अभिवादन
By admin | Published: December 10, 2015 01:20 AM2015-12-10T01:20:18+5:302015-12-10T01:20:18+5:30
जिल्ह्यातील विविध शाळा-महाविद्यालयांमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा ५९ वा महापरिनिर्वाण दिन कार्यक्रम घेऊन अभिवादन करण्यात आले.
चंद्रपूर : जिल्ह्यातील विविध शाळा-महाविद्यालयांमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा ५९ वा महापरिनिर्वाण दिन कार्यक्रम घेऊन अभिवादन करण्यात आले.
वैशाली बुद्ध विहार, भिवापूर
चंद्रपूर : वैशाली बुद्ध विहार येथे आमदार नाना श्यामकुळे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना वासुदेव वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली मानवंदना दिली. कार्यक्रमाची सुरूवात तथागत भगवान बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करुन व सामूहिक बुद्ध वंदनेने करण्यात आली. यावेळी सिद्धार्थ धोटे, मंडळाचे अध्यक्ष आनंद सोनटक्के, यशवंत मून, गौरीशंकर टिपले, देवेंद्र गायकवाड व गमतीदास रायपुरे उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी मंडळाचे उपाध्यक्ष दामोधर उमरे, किशोर टिपले, भारवी जीवने, रामकुमार वाहने, अमिता वाघमारे, सविता पेटकर, विद्या सहारे, प्रभाकर भागवत, दादाजी वाघमारे, राम शंभरकर, राकेश नवाडे, पिकू देठे, दिवाकर पेटकर, अरुण दुधे यांनी सहकार्य केले.
राजुरा येथे महापरिनिर्वाण दिन
राजुरा : राजुरा येथे महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करण्यात आले. याप्रसंगी माजी आमदार सुभाष धोटे, जिल्हा परिषद सदस्य अविनाश जाधव, माजी नगराध्यक्ष रमेश नळे, प्रा. अनिल ठाकूरवार, शरीफ सिद्धीकी, गिता पथाडे, सुधाकर मालखेडे, रिपार्इंचे शामसुंदर मेश्राम, देवचंद तभाने उपस्थित होते. कार्यक्रमात जगन्नाथ पुणेकर, वसंत मून, रामदास वाघमारे, दिगांबर उमरे, तुकाराम रायपुरे, यशोधरा देठे, गिरजा जगताप, योगेश रायपुरे, योगेश करमनकर, महेंद्र वनकर, रविंद्र उमरे, गौतम देवगडे, गौतम चोरे यांचा सहभाग होता.
सी.एन.सी टेक्नालॉजी, चंद्रपूर
चंद्रपूर : एस. एफ. इंस्टिट्युट आॅफ सी.एन.सी. टेक्नालॉजी व सोबतच दुर्गापूर पोलीस स्टेशन यांच्या सहयोगाने महामानवाला अभिवादन व पाणी वाटप कार्यक्रम पार पडला. सी.एन.सी. टेक्नालॉजीचे संस्थापक मिलींद कातकर यांनी दीप प्रज्वलन करून बाबासाहेबांना श्रद्धाजंली अर्पण केली. कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे प्रा. लाडे, मुरमाडे यांनी विद्यार्थ्यांना संविधानाचे महत्त्व पटवून दिले. याप्रसंगी अक्षय शिंदे, अनिल सावळे, सचिन साखरकर, दीक्षा शेंडे, प्रकृती गणविर, काजल पाटील, अश्विनी पिंगे, स्नेहा कातकर, संदेश साव, अतुल दुर्योधन, राहुल रायपुरे, शैलेंद्र पाटील, आकाश खैरे, प्रियंका दुपारे, स्वप्नील रत्नपारखी, किशोर पाटील, रितेश तोतडे, निश्चल देवगडे, सुरेश अलोणे, आकाश खैरे, विनम्र गेडेकर, प्रियंका कातकर, अमित मून, भुषण रामटेके, आशिष रामटेके, धीरज दुर्योधन, मंदाकिनी दुपारे, प्रफुल्ल मालखेडे, निशांत साठे, विनोद जुमडे, स्वीटी भडके, वैशाली खैरे, रचना गोमासे, प्रतिभा मेश्राम आदी उपस्थित होते.
गडचांदूर येथे महापरिनिर्वाण दिन
गडचांदूर : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ५९ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त गडचांदूर शहरातील बाबासाहेबांच्या पुतळ्याला अनेक सामाजिक संघटनांच्या तसेच वॉर्डावॉर्डातील लाखो आंबेडकरी अनुयांयानी अभिवादन केले. सायंकाळी ६ वाजता बाबासाहेबांच्या पुतळ्यापासून भीमज्योत मिरवणूक काढण्यात आली. ‘बाबासाहेब अमर रहे, जब तक सूर्य चांद रहेगा, अशा घोषणा देत मिरवणूक शहरातील प्रमुख मार्गाने फिरुन परत बाबासाहेबांच्या पुतळ्याजवळ येऊन पोहोचली. याप्रसंगी प्रा. डॉ. हेमचंद दुधगवळी, माजी सभापती महेंद्र ताकसांडे, प्रा. प्रशांत खैरे, पद्माकर खैरे, दशरथ डांगे, सोमेश्वर सोनकांबळे, कविकश निरंजने, सोमाजी मून, गुलाब बोरकर, प्रा. कीर्तीकुमार करमनकर यांच्यासह हजारो आंबेडकरी अनुयायांनी बाबासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पचक्र अर्पण केले.
महात्मा गांधी विद्यालय, गडचांदूर
गडचांदूर : महात्मा गांधी विद्यालय कनिष्ठ महाविद्यालय, विज्ञान महाविद्यालय गडचांदूर यांच्या संयुक्त विद्यमाने भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन कार्यक्रम घेण्यात आला. अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. अनिल चिताडे होते तर प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे सहसचिव धनंजय गोरे, प्राचार्य सुभाष पाथ्रीकर, प्राचार्य डॉ. अनिस खान, प्रा. स्मिता चिताडे होत्या. सर्वप्रथम डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करून आदरांजली वाहली. याप्रसंगी गरीब शालेय विद्यार्थ्यांना गणवेश, बुट वाटप करण्यात आले. तसेच ग्रामीण रुग्णालय गडचांदूर, लाल बहादूर शास्त्री वसतिगृह येथे कार्यक्रम घेण्यात आले.
तुकोबाराय वाचनालय, चंद्रपूर
चंद्रपूर : स्थानिक तुकोबाराय सार्वजनिक वाचनालयात भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आदरांजली कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दिलीप परकारे होते. तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून शुद्धोधन गराडकर, धनराज पाटील, गुरुदास शेंडे उपस्थित होते. बाबासाहेबांच्या प्रतिमेस पुष्पमाला अर्पण करुन व मौन पाळून बाबासाहेबांना श्रद्धाजंली वाहण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रणाली तुमसरे यांनी केले. संचालन ग्रंथपाल गोमदेव थेरे तर आभार सुयोग दुर्गे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गोमदेव थेरे, गिरीधर काटवले, दिलीप परकारे, चेतन बोंडे यांनी सहकार्य केले. यावेळी वाचनालयात उपस्थित सर्व विद्यार्थ्यांची कार्यक्रमाला उपस्थिती होती. (लोकमत चमू)
चंद्रपुरात ‘एक पेन, एक नोटबुक’ उपक्रम
चंद्रपूर शहरामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी प.पु. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुर्णाकृती पुतळा चंद्रपूर येथे कार्यक्रम आयोजित केला जाते. या कार्यक्रमात आदरांजली व अभिवादन करण्याकरीता जनता येत असते. कार्यक्रमाचे औचित्य साधून ‘एक दिवस समाजाकरीता’ या चळवळीच्या वतीने गोरगरीब आणि होतकरु विद्यार्थ्यांना मदत म्हणून एक पेन व एक नोटबुक दान करण्यात यावी असे आवाहन करण्यात आले होते. या आवाहानास नागरिकांनी उत्स्फुर्त प्रतिसाद देत मोठ्या प्रमाणात पेन व नोटबुक दान दिले. याप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महामानव प.पु. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळा चंद्रपूर येथे मानवंदना देण्याकरीता आले असता तथागत पेटकर यांनी प्रत्यक्ष मुख्यमंत्री यांना भेटून गोरगरीब विद्यार्थ्यांकरिता अशा प्रकारचे उपक्रम राबवित असल्याची माहिती दिली. तेव्हा मुख्यमंत्री फडणविस यांनी उपक्रमाचे कौतुक करून विद्यार्थ्यांनाकरिता नोटबुकामध्ये संदेश व अभिप्राय लिहून ‘एक पेन- एक नोटबुक’ या उपक्रमास विद्यार्थ्यांकरिता भेट म्हणून दिले. तसेच राज्याचे वित्त व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सुद्धा बाबासाहेबांना आदरांजली वाहण्याकरीता पुतळ्याजवळ आले असता या उपक्रमास मदत केली. आणि या कार्यकरीता शुभेच्छापर अभिप्राय नोटबुकामध्ये लिहून एक पेन एक नोटबुक या उपक्रमास भेट म्हणून दिले. या उपक्रमात कार्यकर्ते सुनिता पेटकर, प्रशांत मेश्राम, अॅड. जगदीश खोब्रागडे, विशाल कवाडे, मयूर गौरकर, रितेश तोतडे, डॉ. विनोदभाई फुलझेले, लक्की पाटील, सचिन उमरे, चंद्रकिरण तामगडे, डॉ. अजित खोब्रागडे, विनोद सोनटक्के, अॅड. निलेश साव, निखीलेश अलोणे, संदीप सोनोने, संदीप खोब्रागडे, अतुल वनकर, योगेश पडवेकर इत्यादी कार्यकर्ते सहभागी होते.