बाबासाहेबांच्या अस्थिकलश रॅलीने दुमदुमले शहर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2017 10:42 PM2017-10-16T22:42:21+5:302017-10-16T22:42:50+5:30

धम्मचक्र अनुप्रवर्तन सोहळ्यानिमित्त स्थानिक गोलबाजारातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला अभिवादन करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थिकलशाची मिरवणूक सोमवारी सकाळी काढण्यात आली.

Babasaheb's unstable rallies make up the city | बाबासाहेबांच्या अस्थिकलश रॅलीने दुमदुमले शहर

बाबासाहेबांच्या अस्थिकलश रॅलीने दुमदुमले शहर

Next
ठळक मुद्देसमता सैनिक दलाचे पथसंचलन : जिल्ह्यातून अनुयायी रॅलीत सहभागी

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : धम्मचक्र अनुप्रवर्तन सोहळ्यानिमित्त स्थानिक गोलबाजारातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला अभिवादन करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थिकलशाची मिरवणूक सोमवारी सकाळी काढण्यात आली. यावेळी समता सैनिक दलाच्या ५०० सैनिकांनी केलेले पथसंचलन लक्ष वेधून घेत होते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरिअल सोसायटीने फुलांची सजविलेल्या रथावर डॉ. आंबेडकर यांचा अस्थिधातू कलश ठेवण्यात आला होता. रथावर भन्ते आर्य नागार्जुन सुरई ससाई, मेमोरिअल सोसायटीचे अध्यक्ष अरूण घोटेकर व भिक्खु संघ आदी स्थानापन्न होते.
‘बौद्ध धम्म चिरायू हो’, ‘डॉ. बाबासाहेबांचा जयजयकार हो’, अशा विविध घोषणा देत सकाळी ११ वाजता मिरवणुकीला सुरुवात झाली. मिरवणुकीचे संचालन समता सैनिक दलाचे समता सैनिक करीत होते. त्यांच्या मागे भारतीय बौद्ध महासभेचे उपासक-उपासिका रांगेमध्ये चालत होत्या. या मिरवणुकीत पांढरा गणवेश घातलेले महिला, पुरुष व बालके सहभागी झाले होते. चंद्रपूर शहरातील विविध वस्त्यांमधून स्त्री-पुरुषांचे जत्थे मिरवणुकीत सहभागी होण्यासाठी डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ एकत्र आले होते. अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने ही मिरवणूक जटपुरा गेट मार्गाने निघाली. पांढºया गणवेशातील मिरवणूक शांततेचा संदेश देत पुढे जात होती. ही मिरवणूक पाहण्याकरिता रस्त्याच्या दुतर्फा लोकांची गर्दी झाली होती. बॅ. राजाभाऊ खोब्रागडे यांच्या पूतळ्याला मालार्पण करून जटपुरा गेट, पाण्याची टाकीमार्गे मिरवणूक दीक्षाभूमी येथे पोहोचली. मिरवणुकीत समता सैनिक दलाचे ५०० सैनिक सहभागी झाले होते. तेथे भव्य स्वागत करण्यात आले. ही मिरवणकू दीक्षाभूमीवर आल्यावर भदन्त आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांच्या हस्ते बाबासाहेबांचा अस्थिकलश बुध्द विहारात जनतेच्या दर्शनार्थ ठेवण्यात आला. त्यानंतर समता सैनिक दलाच्या विद्यार्थ्यांनी भदन्त सुरेई ससाई यांना मानवंदना दिली व बाबासाहेबांच्या चळवळीप्रति कटीबध्द राहण्याची शपथ घेतली.
दीक्षाभूमीवर संस्थेचे अध्यक्ष अरुण घोटेकर, जिल्हाधिकारी आशुतोष सलिल, पोलीस अधीक्षक नियती ठाकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी पवित्र दीक्षाभूमीवर लाखोच्या संख्येत भीमसागर उसळला होता.
अनेकांनी घेतले अस्थिकलशाचे दर्शन
दीक्षाभूमी येथील बुद्ध विहारात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अस्थीकलश दर्शनासाठी ठेवण्यात आले होते. दीक्षाभूमीवर आलेल्या जिल्ह्यातील व जिल्ह्याबाहरील पाहुण्यांनी सर्वप्रथम विहारात ठेवलेल्या बाबासाहेबांच्या अस्थीचे दर्शन घेतले.

Web Title: Babasaheb's unstable rallies make up the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.