बाबुराव शेडमाके यांचे क्रांतीकारी विचार अंगिकारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2016 12:53 AM2016-10-29T00:53:56+5:302016-10-29T00:53:56+5:30

सर्व गोंडीयन बांधवांनी वीर बाबुराव शेडमाके यांचे विचार घराघरात पोहोचवून त्यांचे विचार अंगिकार करा, ...

Baburao Shadmake's Revolutionary Thoughts Angikara | बाबुराव शेडमाके यांचे क्रांतीकारी विचार अंगिकारा

बाबुराव शेडमाके यांचे क्रांतीकारी विचार अंगिकारा

Next

अवचितराव सयाम : गोंडवाना कुपार लिंगो सगा समितीचे आयोजन
चंद्रपूर : सर्व गोंडीयन बांधवांनी वीर बाबुराव शेडमाके यांचे विचार घराघरात पोहोचवून त्यांचे विचार अंगिकार करा, असे आवाहन वर्धा येथील प्रसिद्ध विचारवंत अवचितराव सयाम यांनी केले.
गोंडवाना कुपार लिंगो सगा समिती, दुर्गापूर द्वारा आयोजित राष्ट्रीय शहीद वीर बाबुराव पुल्लेसूर राजगोंड शेडमाके यांचा १५८ व्या शहीद दिन हनुमान मंदिर उर्जानगर येथे पार पडला. यावेळी सयाम बोलत होते. क्रांतिवीर बाबुराव शेडमाके चौक येथे पेरसापेन गोंगो पूजन करण्यात आले. त्यानंतर दुर्गापूर येथून भव्य मिरवणूक कार्यक्रम स्थळापर्यंत काढण्यात आली. गोंडराजे वीरेंद्रशहा आत्राम, अवचितराव सयाम सर्व गोंडियन व समाजाच्या वतीने आदरांजली देण्यात आली.
उद्घाटक अवचितराव सयाम म्हणाले की, आरक्षणामध्ये घुसखोरी करणाऱ्यांना धडा शिकवणे आवश्यक आहे. त्यासाठी गोंडीयन सगा बांधवांनी न्याय हक्कासाठी लढा देण्यासाठी तत्पर राहावे. गोंडीयन विद्यार्थ्यांना पदवीपर्यंतचे शिक्षण घेणे आवश्यक आहे. निश्चय करा सर्व गोंडीयन समाज बांधवांनी संघटित होऊन अन्यायाविरुद्ध लोकशाही मार्गाने लढा उभारावा, असेही ते म्हणाले.
सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून गोंडराजे विरेंद्रशहा आत्राम चांदागड हे होते. प्रमुख अतिथी म्हणून डॉ.संजय आत्राम, प्रा. शांताराम उईके, मनोज आत्राम, माजी पं.स. उपसभापती डॉ.श्रीकांत मसराम, ऋषी कोटनाके, संतोष मसराम, कुमद जुमनाके, विजय तोडासे, या सर्वांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. धीरज शेडमाके यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन मुक्तेश्वर मसराम यांनी तर आभार प्रदर्शन मुकेश नैताम यांनी केले. (प्रतिनिधी)

Web Title: Baburao Shadmake's Revolutionary Thoughts Angikara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.