धान उत्पादक शेतकऱ्यांनी फिरविली बाजार समितीकडे पाठ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2019 05:00 AM2019-12-24T05:00:00+5:302019-12-24T05:00:40+5:30
तालुक्यात धानाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतल्या जाते. एकूण क्षेत्रफळापोकी ३० हजार हेक्टर क्षेत्रात धानाचे उत्पादन होते. नोव्हेंबर- डिसेंबर महिन्यात धानाचे पीक शेतकºयांच्या हातात येते. यानंतर शेतकरी धान विक्रीसाठी बाजार समितीमध्ये नेतात, असा आजवरचा अनुभव आहे. मात्र यावर्षी वेगळेच चित्र दिसून येत आहे.
घनश्याम नवघडे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागभीड : कृषी उत्पन्न बाजार समित्यांपेक्षा सोसायटीमध्ये धानाला अधिक भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांचा कल विविध कार्यकारी सोसायट्यांकडे वाढला आहे. परिणामी बाजार समितीमध्ये धानाची आवक मंदावल्याचे दिसून येत आहे.
तालुक्यात धानाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतल्या जाते. एकूण क्षेत्रफळापोकी ३० हजार हेक्टर क्षेत्रात धानाचे उत्पादन होते. नोव्हेंबर- डिसेंबर महिन्यात धानाचे पीक शेतकºयांच्या हातात येते. यानंतर शेतकरी धान विक्रीसाठी बाजार समितीमध्ये नेतात, असा आजवरचा अनुभव आहे. मात्र यावर्षी वेगळेच चित्र दिसून येत आहे. शासनाने यावर्षी काही सोसायट्यांना धान खरेदीचे अधिकार दिले आहेत. या सोसायट्यांचे हमीभाव १ हजार ८३५ अधिक ५०० बोनस असे असल्याने शेतकरी आपले धान सोसायटीमध्येच विक्री करण्याचा प्रयत्न करीत आहेत.
उलटपक्षी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये धानाचे भाव १ हजार ९०० ते २ हजार रूपयांच्या पलिकडे नसल्याची माहिती आहे. दरामधील ही तफावत लक्षात घेता बहुतांशी शेतकºयांनी धान विक्रीसाठी आपला मोर्चा आदिवासी सोसायट्याकडेच वळविला आहे. परिणामी धान खरेदीचे अधिकार असलेल्या सोसायट्यांसमोर शेतकºयांनी विक्रीसाठी आणलेले धान कुठे ठेवावे, हा प्रश्न निर्माण झाला आहे, अशी माहिती पदाधिकाºयांनी दिली.
धान खरेदी करणाऱ्या सोसायट्या
आदिवासी विकास महामंडळाने ज्या सोसायट्यांना धान खरेदीचे अधिकार दिले. त्यामध्ये नवखळा, चिंधी चक, गोविंदपूर, कोजबी (माल), गिरगाव, सावरगाव, जीवनापूर, बाळापूर येथील आदिवासी सोसायट्यांचा समावेश आहे. याशिवाय पणन महासंघाने नागभीड येथील खरेदी विक्री संघ व कोर्धा येथील श्री गुरूदेव राईस मीलच्या सोसायटीलाही धान खरेदी करण्याचे अधिकार प्रदान करण्यात आले.
तहसीलदारांनी घेतली सात-बाराची हमी
सोसायटीमध्ये धानाची विक्री करायची असेल तर सदर शेतकºयाचा चालू स्थितीतला सात-बारा असणे आवश्यक आहे. सातबाºयासाठी शेतकरी तलाठी कार्यालय जात आहे. मात्र, तलाठी संपावर आहेत. त्यामुळे शेतकºयांची कोंडी सुरू झाली. अनेक शेतकऱ्याना धान विकता येत नाही. संप कधी सुटणार हे अद्याप निश्चित नाही. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त आहेत. दरम्यान सातबाऱ्याअभावी धान विक्रीसाठी अडचणी येऊ नये, यासाठी धान खरेदी करण्याचे व संप मिटताच तलाठ्यांकडून सात-बारा उपलब्ध करून देण्याची हमी तहसीलदारांनी दिली, अशी माहिती माहिती चिमूर आदिवासी विकास महामंडळाचे उपप्रादेशिक व्यवस्थापक जी. आ. राठोड यांनी दिली.
धान उत्पादक शेतकºयांची संख्या मोठी आहे. अनेक शेतकरी आता धान विक्री करत आहेत. परंतु, बाजार समितीत धानाची आवक कमी झाली.
- सप्तेश गुप्ता, सचिव, कृषी उत्पन्न बाजार समिती, नागभीड.
बाजार समित्यांपेक्षा सोसायटीमध्ये धानाला जास्त भाव मिळत आहे. त्यामुळे बाजार समित्यांमध्ये विक्रीसाठी आणलेला शेतमला शेतकरी परत नेत आहेत. शासनाने सोसायटीचे दर बाजार समितीतही लागू केले पाहिजे अन्यथा बाजार समित्या बंद पडण्याचा धोका आहे.
- संजय माकोडे, व्यापारी, नागभीड.