मागास महिलांचे सक्षम पाऊल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2018 11:10 PM2018-10-12T23:10:13+5:302018-10-12T23:11:08+5:30

नवरात्र हा आदिशक्ती, मातृशक्तीचा उत्सव आहे. मातृशक्ती सुदृढ व सशक्त करायची असेल तर महिलांचे सक्षमीकरण अत्यंत गरजेचे आहे. पोंभुर्णा येथे आदिवासी महिलांद्वारे संचालित कुक्कुटपालन प्रकल्प हा दुर्गम भागातील महिलांचे सक्षम पाऊल आहे, असे कौतुकोदगार राज्याचे वित्त, नियोजन व वनेमंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी काढले.

Backward women's able steps | मागास महिलांचे सक्षम पाऊल

मागास महिलांचे सक्षम पाऊल

Next
ठळक मुद्देसुधीर मुनगंटीवार : आदिवासी महिलांची पोल्ट्री प्रोड्युसर्स कंपनी

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : नवरात्र हा आदिशक्ती, मातृशक्तीचा उत्सव आहे. मातृशक्ती सुदृढ व सशक्त करायची असेल तर महिलांचे सक्षमीकरण अत्यंत गरजेचे आहे. पोंभुर्णा येथे आदिवासी महिलांद्वारे संचालित कुक्कुटपालन प्रकल्प हा दुर्गम भागातील महिलांचे सक्षम पाऊल आहे, असे कौतुकोदगार राज्याचे वित्त, नियोजन व वनेमंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी काढले.
पोंभुर्णा येथे आदिवासी महिलांद्वारे संचालित कुक्कुटपालन संस्थेच्या पहिल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ना.सुधीर मुनगंटीवार बोलत होते. यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले, साधारणत: कंपनी असे म्हटले तर टाटा, बिर्ला अशी मोठी नावे डोळयासमोर येतात. पोंभुर्णा महिला पोल्ट्री प्रोडयुसर्स कंपनी लिमी. ही कंपनी माझ्या भगिनींची कंपनी आहे. याचा मला खरोखर अभिमान आहे, असेही ते म्हणाले.
या मतदार संघात रोजगार व स्वयंरोजगाराला चालना देणारे अनेक प्रकल्प आपण राबवित आहोत. चिचपल्ली येथील बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्राची दखल सिंगापूरच्या प्रसार माध्यमांनी घेतली आहे. मत्स्यपालन, दुग्धव्यवसाय आपण या भागात राबविणार आहोत. १५ नोव्हेंबरपर्यंत टुथपिक तयार करण्याचा प्रकल्प आपण कार्यान्वित करणार आहोत. पोंभुर्णा येथे मॉडेल पंचायत समिती आपण उभारत आहोत. युवक-युवतींना स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी साहित्य उपलब्ध करण्याच्या दृष्टीने अद्ययावत वाचनालय उभारत आहोत. पोंभुर्णा येथे पोलीस प्रशिक्षण केंद्र निर्माण होत आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्याच्या दृष्टीने मूल आणि पोंभूर्णा तालुक्यात टाटा ट्रस्टच्या सहाय्याने सधन शेतकरी प्रकल्प आपण राबवित आहोत. पोंभुर्णा येथे सुसज्ज अशी ग्रामीण रूग्णालयाची इमारत उभी होत आहे. चिचडोह सिंचन प्रकल्प आपण पूर्ण केला आहे. लवकरच हा प्रकल्प शेतकऱ्यांच्या सेवेत रूजू होणार आहे. विशेष बाब म्हणून मूल व पोंभुर्णा तालुक्यातील शेतकऱ्यांना विहिरी आपण उपलब्ध करून दिल्या आहेत, असेही त्यांनी सांगितले. यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळे, पोंभुर्णा पंचायत समितीच्या सभापती अल्का आत्राम, नगर पंचायत अध्यक्ष श्वेता बनकर, गजानन गोरंटीवार, अविनाश परांजपे, जि.प.सदस्य राहुल संतोषवार, न.प. उपाध्यक्ष रजिया कुरैशी, जि.प. सदस्य गौतम निमगडे, पंचायत समिती उपसभापती विनोद देशमुख, पोंभुर्णा महिला पोल्ट्री प्रोडयुसर्स कंपनी लिमी. च्या अध्यक्ष यमुना जुमनाके, कुंतीबाई धुर्वे, तहसीलदार टेमकर आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.
२८, २९ ला युथ एम्पॉवरमेंट समीट
पंतप्रधानांसमोर आपल्या प्रकल्पाचे निर्भीडपणे सादरीकरण करणाऱ्या कुंतीबाई धुर्वे यांचे कौतुक करत ना.सुधीर मुनगंटीवार पुढे म्हणाले, मिशन शक्तीच्या माध्यमातून जिल्हयातील आदिवासी विद्यार्थ्यांनी माऊंट एव्हरेस्टवर झेंडा फडकवला. २८ आणि २९ आॅक्टोंबरला बल्लारपूर येथे युथ एम्पॉवरमेंट समीट आपण आयोजित करीत आहोत. त्या माध्यमातून मिशन सेवा, मिशन स्वयंरोजगार, मिशन कौशल्य विकास, मिशन फॉरेन सर्विसेस, मिशन सोशल वर्क, मिशन उन्नत शेती या सहा मिशनची सुत्री आपण अमलात आणत आहोत. हा जिल्हा रोजगार व स्वयंरोजगारयुक्त व्हावा हेच आपले ध्येय असल्याचे ना.सुधीर मुनगंटीवार यावेळी बोलताना म्हणाले.

Web Title: Backward women's able steps

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.